नवी दिल्ली : Solar Flare शनिवारी (30 ऑक्टोबरला) पृथ्वीला धडकू शकतं, असं नासाने सांगितलं. Solar Flare हे AR2887 या सनस्पॉटमधून येत आहे. सनस्पॉटच्या माध्यमातून पृथ्वीच्या दिशेने येणारं हे सौर वादळ कोणते नुकसान करू शकते का हे ठरवता येणार आहे, असं नासाने म्हटलं. या सौर वादळाचा परिणाम काही तास राहील असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 28 ऑक्टोबरला 11 वाजून 35 मिनिटांनी सूर्यावर एक स्फोट झाला. त्यामुळे हे वादळ निर्माण झाले आहे.
नासाच्या सोलर डायनेमिक्स आब्जर्वेटरीने सुर्यातून निघणाऱ्या सौर वादळाला टिपले आहे. हा Solar Flare मोठ्या सौर वादळाचा संकेत मानला जात आहे. नासाच्या मते, Solar Flare आज शनिवारी (30 ऑक्टोबरला) पृथ्वीला धडकू शकतो.
स्पेसवेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या सौर वादळाचा परिणाम काही तास राहील असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 28 ऑक्टोबरला 11 वाजून 35 मिनिटांनी सुर्यावर एक स्फोट झाला. त्यामुळे हे वादळ निर्माण झाल आहे. हे सौर वादळ सुर्याच्या केंद्रापासून येत आहे. याची प्रचंड प्रकाश किरणे सरळ पृथ्वीवर पडू शकतात.
या सौर चक्रीवादळाला X1 Category मध्ये ठेवण्यात आले आहे. जे शनिवारी पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्राशी धडकू शकते. या सौरवादळामुळे मोठे ब्लॅकआऊट होऊ शकते. US Spcace Weather Prediction Center च्या मते, त्याचा परिणाम दक्षिण अमेरिकेत दिसू शकतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वैज्ञानिकांच्या मते, सुर्याच्या केंद्रातून निघणाऱ्या तिक्ष्ण सौर वादळं ही रेडिएशनचा शक्तिशाली विस्फोट आहेत. परंतु हे तिक्ष्ण रेडिएशन पृथ्वीच्या वातावरणाला पार करून मानवाला धोका निर्माण करू शकत नाही. परंतु त्यामुळे वातावरणाच्या लेअरमध्ये जीपीएस आणि कम्युनिकेशन सिग्नलवर परिणाम होऊ शकतो.
असे सांगितले जात आहे की हे जोरदार सौर वादळ किरणोत्सर्गाचा शक्तिशाली स्फोट आहे, जरी ते मानवांना हानी पोहोचवू शकत नाही. असेही सांगितले जात आहे की त्याची चमक इतकी मजबूत असेल की जीपीएस आणि कम्युनिकेशन सिग्नल प्रवास करत असलेल्या वातावरणाच्या थरांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
तत्पूर्वी, यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) अंतर्गत स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने शुक्रवारी सौर वादळाचा इशारा जारी केला होता. गुरुवारी रात्री उशिरा सूर्यापासून कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) झाल्यानंतर हे वादळ 30 ऑक्टोबर रोजी येऊ शकते, असे केंद्राने म्हटले होते. ज्याचा पृथ्वीशी टक्कर होण्याचा धोका आहे. कोरोनल मास इजेक्शन (CME) हा सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठा उद्रेक आहे.