आबूधाबी : टी-20 वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. परंतु या सामन्यात अफगाणिस्तानला चिअर करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहते उपस्थित होते आणि त्यातील बरेचसे विनातिकीट स्टेडियममध्ये घुसले होते. तर तिकिट असूनही पाकिस्तानी चाहत्यांना बाहेरच थांबावे लागले. त्यानंतर स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने सलग तिसरा विजय मिळवला. पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला. यामुळे सध्या पाकिस्तानच्या टीमची चर्चा सुरू आहे. असे असताना मात्र मॅच दरम्यान स्टेडियमवर तुफान राडा झाला.
दोन्ही देशांचे फॅन्स स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर याठिकाणी वाद होण्यास सुरुवात झाली. काही फॅन्स तिकीट न घेताच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. आणि यादरम्यानच त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ आता समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.
या लाजिरवाण्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मोठ्या संख्येने चाहते आपापल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी दुबईला आले होते. यादरम्यान स्टेडियममधील जागा पूर्णपणे बुक झाल्याने बऱ्याच चाहत्यांना तिकीट मिळाले नाहीत.
Afghan crowd is desperate to watch match many are arrested by police they were trying to enter stadium without ticket #afg #pak #PakvsAfg pic.twitter.com/d0bR78vqBA
— Qamber Zaidi (@qamberzaidii) October 29, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा सामना पाकिस्तानने जिंकताच त्यांचा एक फॅन थेट पिचवर दाखल झाला. त्यालाही सुरक्षा रक्षकांकडून पकडण्यात आले. दरम्यान अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान यांनी या मॅचपूर्वी सर्व फॅन्सना शांततेचे आवाहन केले होते. मात्र तरीही मोठा गोंधळ झाला.
इतकेच नव्हे तर, चाहत्यांनी केवळ स्टेडियमबाहेरच नव्हे तर स्टेडियममध्येही गोंधळा घातला. सामन्यादरम्यान अफगानिस्तान आणि पाकिस्तान संघातील २ चाहते एकमेकांशी भिडलेले पाहायला मिळाले. अगदी त्यांनी धक्काबुक्की करण्यासह एकमेकांना लाथा मारण्याची कृती केली. यावेळी स्टेडियममधील सेक्यूरिटी गार्डला धाव घेत त्यांचे भांडण मिटवावे लागले.
सामना संपण्याआधी दोन्ही देशांचे फॅन्स अधिक उत्साहित झाले होते. त्यांनी आपल्या टीमला प्रोत्साहन देताना इतरांशी मारामारी सुरु केली. यानंतर काहीवेळ गोंधळही उडाला. सुरक्षा रक्षकांनी येथील परिस्थिती नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. यामुळे पाकिस्तानने विजयी हॅट्ट्रिक नोंदवली आहे. शेवटच्या २ षटकात २४ धावांची गरज असताना पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात ४ षटकार ठोकून सामना जिंकवून दिला.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा हा सलग तिसरा विजय आहे. या आधी पाकिस्तानने पहिल्यांदा भारताला आणि नंतर न्यूझीलंडला धूळ चारली होती. या विजयासोबत पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाकिस्तानचे उर्वरित दोन सामने हे नामिबिया आणि स्कॉटलंड सोबत आहेत.