क्रुझ पार्टीच्या प्रकरणात ड्रग्ज घेतल्याच्या संशयाखाली शाहुरूख खान च्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला एन सी बी या विशेष तपास यंत्रणेने अटक केली . त्यानंतर महाराष्ट्रात मिडिया हाऊसेसमध्ये हा चोथा चोविस तास चघळत राहिला.
समिर वानखेडे हे भाजपाच्या सांगण्यावरुन बाँलिवुडमधील बड्या हस्तीला टार्गेट करित असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर मलिक विरुध्द समिर वानखेडे हा संघर्ष मिडियामुळे महाराष्ट्राला पाहिला मिळाला. पण या वादात भाजपाला फक्त महाराष्ट्राला बदनाम करणं बाँलिवुड राज्याबाहेर पळवनं व तर मलिकांना आर्यन खान ची बाजु घेत मुस्लिम मतांची व्होट बँक मजबूत करणे हेच ते दोघांना टार्गेट होते.
पण या सर्व जागरण गोंधळात महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे हा प्रश्न आहे. वानखेडेंचा बाप दाऊद होता की छोटा राजन यावरुन जनतेला काय फायदा ? आर्यन खान ने ड्रग्ज घेतले की गांजा यावरुन महाराष्ट्राला काय फायदा ? वानखेडेंनी एक लग्न केलं की दोन यावरुन जनतेला काय फायदा? याची ऊत्तरं केंद्र सरकार व नवाब मलिक या दोघांनीही द्यावी.
एका बाजुला महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टीचा दणका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेला मुग ऊडीद सोयाबिन या पिके ओढ्या नाल्यात वाहुन गेली. शेतकरी ऊध्दवस्त झाला. सरकार ने मदत जाहिर केली पण ६५ मिलीमिटर पाऊसाची अट घातली, पण रोज महाराष्ट्रात ६० मिली मीटर पाऊस पडला त्याचं काय ? आमदारांच्या पगार वाढ करताना कोणत्या अटी लावल्या होत्या याचं ऊत्तर नवाब मलिक देतील काय?
व्यसनाधिन पुड्यांची जाहिरात करणाऱ्या शाहरुखच्या गंजड्या पोराच्या अन भाजपाला हप्ता मिळवुन देणाऱ्या खंडणीखोर समीर वानखेडे च्या वादावर नवाब मलिक यांनी दिवस रात्र एक केली अन आर्यन खान ड्रग्ज ते समीर वानखेडे चे दुसरं लग्न इथपर्यंतचा प्रवास ऊकरुन काढला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात ED , CBI अशा तपासयंत्रणा या केंद्र सरकारसाटी काम करित असल्या तरी महाराष्ट्रातील सरकार व त्यातील मंत्री तरी कुटं शेतकरी कामगारांसाटी काम करतात ते सुध्दा बाँलिवुड मधील धनदांडग्या लोकांसाटीच व एका विशिष्ट धर्माची व्होट बँक मिळवण्यासाटीच काम करतात हे मलिक वानखेडे या वादाच्या निमित्ताने स्पष्ट दिसुन येत आहे.
राज्यातील वीज भारनियमन , शेतकऱ्याकडून होत असलेली सक्तीची वीज बील वसुली , अतिवृष्टीतून उद्धवस्त झालेला शेतकरी , वाढती बेरोजगारी , एस.टी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाच्या पगारी , वाढते इंधन दर हे अनेक मुद्दे बोलायला आवाज उठवायला असताना नवाब मलिक त्यावर कोणताच अभ्यास करित नाहीत. तर याच विषयावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुध्दा या मुद्यावर बघ्याची भूमिका घेत आहेत.
आर्यन खान , समीर वानखेडे , नवाब मलिक तुमच्यावरुन आमच्या शेतकरी कष्टकरी महाराष्ट्राला काहीही घेणं देण नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्या. मिडिया हाऊसेसवाल्यांनी सुध्दा पांचट विषयांना किती महत्व द्यायचं यावर चिंतन मंथन केले पाहिजे.
सध्या महाराष्ट्रात मनापासून आपलं काम करणारे म्हटलं तर ८० वर्षाचा तरुण खा.शरद पवार , खा. नितीन गडकरी , ऊध्दव टाकरे , अजित पवार , जितेंद्र आव्हाड , बाळासाहेब थोरात अशी खुप मोजकी माणसं आहेत. सुर्य ऊगवल्यापासुन आपल्या कामात व्यस्त आहेत. नवाब मलिक या वरिष्ठांकडून काहीतरी आदर्श घेतील व महाराष्ट्रातील वानखेडे, आर्यन खान हा जागरण गोंधळ संपवतील, ही आशा आहे.
* हर्षल बागल – पत्रकार