सोलापूर : पंढरपूरला येणार्या पालखी मार्गावर गावोगावी बीअर शॉपी थाटण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून अनेकजण प्रयत्न करत आहेत. अशीच परिस्थिती पालखी मार्गावरील वाखरी (ता. पंढरपूर) येथे झाली आहे. येथील ग्रामसभेत चक्क 23 बीअर शॉपींना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भाविकांसह सर्वसामान्यांना आश्चर्य वाटत आहे. बिअरशॉपींना प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी घेऊन नाहरकत देण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
आषाढीच्या वेळी पालखी मार्गावर विविध संतांच्या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. तिथे लाखो वारकर्यांचा पालख्यांसह मुक्काम असतो. अशा गावातील बीअर शॉपींना विरोध होण्याऐवजी ग्रामसभेत तब्बल 23 नवीन बीअर शॉपी सुरू करण्यास ‘ना हरकत’ देण्याचा ठराव मंजूर झाला.
तिथे लाखो वारकऱ्यांचा पालख्यांसह मुक्काम असतो अशा गावातील बिअर शॉपींना विरोध होण्याऐवजी ग्रामसभेत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23 नवीन बिअर शॉपी सुरु करण्यास ना हरकत देण्याचा ठराव मंजूर झाला. या नवीन बिअरशॉप सुरु झाल्यास पंढरपूरच्या अगदी वेशीवर प्रवेश करताना वारकऱ्यांना या दुकानांचे बोर्ड पाहत पंढरपुरात प्रवेश करावा लागणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वाखरीच्या सरपंच कविता पोरे म्हणाल्या, ग्रामसभेत महिलांसह अनेकांनी बीअर शॉपींना ‘ना हरकत’ देण्यास विरोध केला होता. परंतु, ठराव मंजूर करण्याच्या बाजूने बहुसंख्येने लोक बोलू लागले. त्यामुळे प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी भरल्यास ‘ना हरकत’ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरुवारी (ता. 28) रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयाला विरोध कमी आणि पाठिंबा जास्त अशी स्थिती झाली. प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी घेऊन तब्बल 23 बीअर शॉपींना ‘ना हरकत’ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या नवीन बीअर शॉपी सुरू झाल्यास पंढरपूरच्या अगदी वेशीवर प्रवेश करताना वारकर्यांना या दुकानांचे बोर्ड पाहत पंढरपुरात प्रवेश करावा लागणार आहे.
दिवंगत आर.आर.पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर शहर आणि लगतच्या गावात परमीटरुम, बिअरशॉपीचे नवीने परवाने दिले जाणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक वर्षे नवीन परवाने दिले गेले नाहीत. परंतु त्यांच्या नंतरच्या काळात नवीन परमीटरुम व बिअरशॉपी सातत्याने वाढत आहेत.
आषाढी यात्रेच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम वाखरीत असतो. त्यामुळे वाखरीत 10 लाखाहून अधिक भाविकांची गर्दी होत असते. पंढरपूर पासून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेल्या या गावात संत लक्ष्मणदास महाराजांची समाधी देखील आहे. त्यामुळे तिथे विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने सुरु असतात. पालखी मार्गावरील या गावात सध्या तीन बिअर शॉपी आहेत. गुरुवारी गावची ग्रामसभा झाली.
त्यामध्ये गावात नवीन दुकाने सुरु करण्यास विरोध करण्याऐवजी नवीन दुकाने सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात यावीत, यासाठी लोकांनी आवाज उठवला. त्यामुळे गोंधळ झाला आणि शेवटी 23 बिअरशॉपींना प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी घेऊन नाहरकत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सद्यागावात असलेल्या 3 आणि नवीन 23 बिअरशॉपी सुरु झाल्यास गावातील लोकसंख्येचा विचार करता 307 लोकांच्या पाठीमागे एक बिअरशॉपी होणार आहे.