Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

माळशिरसमध्ये अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांचा बलात्कार

Surajya Digital by Surajya Digital
November 1, 2021
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
माळशिरसमध्ये अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांचा बलात्कार
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर : उघडेवाडी (ता. माळशिरस) येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची नोंद वेळापूर पोलीस स्टेशनला झाली आहे. ही घटना काल रविवारी घडली. याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे हे करीत आहेत.

अधिक वृत्त असे की, वेळापूर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे की उघडेवाडी येथील युवराज गोडसे, रणजीत कोळकर,व अनोळखी व्यक्तीने बलात्कार केला आहे. या तिघांविरोधात कलम भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे ३०६,३६६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम२०१२ प्रमाणे ४ आणि ८ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक १९८९ प्रमाणे ३(१)(w)(i)व ३(१)(w)(ii) प्रमाणे वेळापूर पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे. यावेळी महिला दक्षता समिती सदस्या अश्विनी भानवसे उपस्थित होत्या.

उघडेवाडी येथील १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी काल रविवारी (३१ ऑक्टोंबर ) बलात्कार केला आहे. या घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस उपअधीक्षक डाॅ. बसवराज शिवपुजे यांनी माहिती घेऊन वेळापूर पोलीस निरीक्षक भगवानराव खरतोडे यांना सूचना केली. या सूचनेवरुन भगवानराव खरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन करे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ थिटे, चालक पोलीस विठ्ठल बंदुके यांचे पथक आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले आहे.

* सुनील नगरात लूम कामगाराची
गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : एमआयडीसी परिसरातील सुनील नगरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय लुम कामगाराने  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रविवारी (ता. 31) सकाळच्या सुमारास घडली.

नागेश नरसप्पा गुनगुंडी (वय४० रा.सुनील नगर,कामगार वसाहत) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी त्यांची पत्नी आणि आई दोघेही कामावर गेले होते. ११ वाजेच्या सुमारास त्याने छताच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. मयत नागेश याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत.

* निमगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

निमगाव (ता.माळशिरस) येथे राहणाऱ्या संतोष विश्‍वनाथ जाधव(वय३६) याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. काल शनिवारी दुपारच्या सुमारास त्याने घरात हा प्रकार केला होता. त्याला अकलूज येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो रविवारी सकाळी मरण पावला. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* हुलजंती येथे आत्महत्येचा प्रयत्न

हुलजंती (ता.मंगळवेढा) येथे राहणाऱ्या पंचाक्षरी लक्ष्मण कनशेट्टी (वय २९)या तरुणाने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. ही घटना रविवारी (ता. ३१) सकाळच्या सुमारास घडली. त्याला मंगळवेढा येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही.

* मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जखमी

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे पाठीमागून चार चाकी वाहन धडकल्याने दुचाकीवरील अजित सदाशिव घोडके (वय ४२) आणि प्रणाली घोडके (वय १८ दोघे रा.नळी ता. पंढरपूर) हे  जखमी झाले. हा अपघात आज रविवारी सकाळी घडला. ते दोघे दुचाकीवरून पंढरपूर येथून गावाकडे निघाले होते. त्यावेळी हा अपघात घडला. त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .

* आहेरवाडी येथे चूल पेटवताना
६ वर्षाची मुलगी भाजून जखमी

सोलापूर – घरासमोर चूल पेटवून पाणी तापवताना कपडे पेटल्याने सहा वर्षाची मुलगी भाजून जखमी झाली. ही घटना आहेरवाडी (ता.दक्षिण सोलापूर) येथे रविवारी (ता. ३१) सकाळच्या सुमारास घडली.

लक्ष्मी बिरप्पा माळी (वय ६ वर्षे रा.आहेरवाडी) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तिने घरासमोर चूल पेटवून पाणी तापवत होती. त्यावेळी वाऱ्याने पेटता प्लास्टीकचा कागद अंगावर पडल्याने हा प्रकार घडला. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

* ब्लेडने वार केल्याने पत्नी जखमी

सोलापूर : सैफुल परिसरातील कांचन गंगानगर येथे घरगुती भांडणातून तोंडावर ब्लेडने वार केल्याने प्रियांका प्रमोद निंबाळकर (वय २६) ही विवाहिता जखमी झाली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा पती प्रमोद याने मारहाण केली , अशी नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.

* नशेत आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर सेटलमेंट फ्री कॉलनी ( नं१) येथे राहणाऱ्या आकाश मोहन खलसे (वय २८) या विवाहित तरुणाने दारूच्या नशेत गळ्यावर ब्लेडने वार करून  घेतल्याने जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलगर वस्ती पोलिस यांची नोंद झाली आहे.

Tags: #Threemen #raped #minorgirl #Malshiras#माळशिरस #अल्पवयीन #मुली #तीननराधमा #बलात्कार
Previous Post

कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज, जिल्हाधिका-यांना पाठविला प्रस्ताव

Next Post

वाखरी पालखी मार्गावर तब्बल 23 बीअर शॉपींना परवानगी, विरोध कमी आणि पाठिंबा जास्त

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
वाखरी पालखी मार्गावर तब्बल 23 बीअर शॉपींना परवानगी, विरोध कमी आणि पाठिंबा जास्त

वाखरी पालखी मार्गावर तब्बल 23 बीअर शॉपींना परवानगी, विरोध कमी आणि पाठिंबा जास्त

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697