नवी दिल्ली / मुंबई : दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत. कलाबेन यांनी भाजपच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन यांना ११८०३५ मतं मिळाली आहेत. तर गावित यांना ६६७६६ मतं प्राप्त झाली आहेत. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे.
दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीयांनी भाजपावर आरोप केले होते. नंतर दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेनेनं पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.
कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे.
आज सकाळी अगदी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मत मिळाली. तर भाजपचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार १५७ मत मिळाली आहेत. सोबतच काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांचाही इथं पराभव झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेनेच्या या विजयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे हे महाराष्ट्राबाहेर दमदार पाऊल आहे. आम्ही अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करत होतो. ती संधी आम्हाला दादरा नगर हवेलीमध्ये प्राप्त झाली. त्याबद्दल त्यांनी तिथल्या मतदारांचे आभारही मानले आहेत. तसेच आजूबाजूच्या दमन, दक्षिण गुजरातमध्ये मतदारसंघांमध्येही काम सुरु करत असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
* कसे निधन झाले, मोहन डेलकर यांच्याविषयी
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेनजीक असलेल्या दादरा-नगर हवेली या मतदारसंघाचे सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मरीन ड्राईव्हवरील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफूल्ल खेडा पटेल यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद करून ठेवले होते. त्याआधारे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यांच्या निधनानंतर तिथं सध्या पोटनिवडणूक जाहिर झाली होती.
१९८९ ला डेलकर हे प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर १९९१ आणि १९९६ ला ते काँग्रेसचे खासदार होते. तर, १९९८ , १९९९ आणि २००४ ला भाजपकडून खासदार झाले. २००९ ला त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ ला मात्र, काँग्रेसकडून न लढता पुन्हा अपक्ष म्हणून लढले व निवडूनही आले होते. त्यांच्या निधनानंतर मागच्या महिन्यात ७ तारखेला स्व. डेलकरांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी मुंबईत येऊन मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच कलाबेन यांना दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली होती.