‘Diwali Pahat’ in Mohol with melodious and sweet songs
मोहोळ : संगीत विद्यालय व संगीत कला अकादमी मोहोळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे येथील नगर परिषदेच्या बालोद्यानमध्ये भक्तीमय दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेल व मधुर गाण्यांच्या सुरानी मोहोळचे रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेश पुराणिक, अशोक पाचकुडवे, मयुर पुराणिक, सांतोष कुलकर्णी, प्रा.दुर्गादेवी जाधव, प्रा. अरुंधती सलगर हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘उठा उठा सकळीक , विठु माझा लेकुरवाळा , खेळ मांडीयेला , एकतारी संगे , कुठे शोधिसी रामेश्वर , शिवतांडव स्तोत्र हे कानडा राजा पंढरीचा आदी अभंग व फणस जंभीर कर्दळी दाटा , बाजाराला विकण्या निघाली , ऐकुनी वेणुचा नाद , जारे जारे नंदाच्या पोरा , देरे कान्हा चोळी लुगडी या गवळणी, भक्तीगीते व भावगीतांचे उत्कृष्ठ सादरीकरण झाले.
कलाकार श्रेया पुजारी, कार्तिकी कुंभार , समृद्धी हराळे , संस्कृती हराळे , साक्षी कुलकर्णी , दुर्गा जाधव , आनिता सलगर , समृद्धी कारंडे , श्रावणी शिंदे , गुरुराज वाघमोडे , प्रवीण कलुबर्मे , ऋतुपर्णा झेंडगे , स्नेहल महामुनी , हनुमंत वाघमोडे , कृष्णा जाधव व प्रणव कडबणे यांनी सादरीकरण केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी दर्जेदार व आकर्षक असे तालबद्ध तबला वादन करण्यात आले. नवनाथ वाघमोडे , सार्थक बोराडे , स्वप्निल गवळी व मनीष गायकवाड यांनी तबला सोलो वादन केले. तर सार्थक झेंडगे , ऋषिकेश झेंडगे , अमर थिटे , प्रणव गायकवाड , विक्रम थिटे , अथर्व कोरे , आयुष स्वामी , ओम सुतार , जुनैद तांबोळी , रोहीत गोंडाळ व ऋतुराज झेंडगे यांनी ताल तीनताल मध्ये विलंबित – मध्य व द्रुत लयीत तबला सोलो वादन केले. यावेळी प्रेक्षकानी टाळ्यांच्या कडकडाट करत दाद दिली.कार्यक्रमात संगीत शिक्षक मयुर पुराणिक (हार्मोनियम) , आंबेजोगाई चे बंकट कुमार बैरागी ( पखवाज) , देवानंद सुतार (तबला) सौरभ गुमते , विनायक ननवरे (टाळ) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स पुणे यांच्या वतीने एप्रिल-मे सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण प्रा. राजेंद्र वाकळे , प्रा. चंद्रकांत देवकते , दत्ता पुराणिक, शैलजा वस्त्रे , पत्रकार भारत नाईक, अनिल गोडबोले , भाऊसाहेब वसेकर, निवृत्ती महामुनी , प्रा साधना कोरे , शिवाजी थिटे चंद्रकांत झेंडगे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
* मोहोळच्या बालकलाकारांचा सत्कार
झी मराठीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ मध्ये नावलौकिक मिळवलेला मोहोळचा कलाकार चि.धिरज शेगर याचा संगीत विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला .
शेवटी माझी वसुंधरा अभियान आंतर्गत वसुंधरा बचाव ही पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पुराणिक यांनी केले, सूत्रसंचालन प्राची पुराणिक यांनी तर अशोक पाचकुडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला मोहोळ शहरातील विद्यार्थी पालक आणि श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.