सोलापूर : मंगवेढ्यात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी 10.15 च्या सुमारास शहरातील चोखामेळा चौक येथील आयसीआयसीआय बँकेसमोर घडली आहे. आनंद शिवपुजे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
आयसीआयसीआय बँकेसमोर हा प्रकार घडला आहे. आनंद शिवपुजे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान खुनी वार करताना जखमी तरुणाने बँकेत प्रवेश केला व आरोपीला रोखून धरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीला लगेच ताब्यात घेतले आहे. सेक्युरिटी दत्तात्रय गोडसे यांनी लागली धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील जखमी हा मूढवी या गावातील रहिवासी असून आरोपी याने मागील भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने खुनी हल्ला केल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले. चोखामेळा चौकामध्ये लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाले होती. या घटनेमुळे शहरात बातमी वाऱ्यासारखी पसरली. बँकेचे कामकाज दोन तासाने पंचनामे होऊन सुरू झाले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक बापू पिंगळे, एपीआय आवटे हवालदार सुनील गायकवाड, तुकाराम कोळी, पी सी तांबोळी दत्तात्रय येलपले. जमीर मुजावर यांनी भेट दिली.
* सोलापुरात मॅच सट्टा बाजारप्रकरणी चार उच्चशिक्षित तरुणांना अटक
सोलापूर : टी-20 विश्वचषक क्रिकेट मॅच यांच्यावरच सट्टा बाजार करणाऱ्या तिघांना पोलीस आयुक्तांच्या भरारी पथक तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून अटक केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेची हकीकत अशी की, 10 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जुळे सोलापुरातील प्रेम नगर येथील शालिनी आर्किड आपारमेंटच्या चौथ्या मजल्यावर प्लॉट नंबर 402 मध्ये अमोघ आनंद साखरे (वय 24 व्यवसाय शिक्षण रा. पूर्व मंगळवार पेठ महादेव गल्ली सोलापूर) , नागेश सुभाष येलमेली (वय 36 व्यवसाय इंजिनियर राहणार शाहीर वस्ती भवानी पेठ सोलापूर ) , शिवराज पांडुरंग हक्के, (वय 32 व्यवसाय मजुरी राहणार मराठा वस्ती सोलापूर), प्रभाकर राजशेखर उपासे (वय 28 व्यवसाय व्यापारी राहणार पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर) असे चौघे मिळून आले. त्या ठिकाणी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर सट्टा चालवीत असल्याची गुप्त बातमी भरारी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांना मिळाली.
जुळे सोलापूर ही सोलापुरातील अतिशय उच्च नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी छापा कारवाई करून टी-20 विश्वचषकाच्या मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक केले आहे.
या कारवाई दरम्यान 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा किंवा टी 20 विश्वचषक क्रिकेट मॅचेसवर सट्टा घेणाऱ्याचा मोठे रॅकेट असल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. लवकरच या रॅकेटच देखील पर्दाफाश करून मोठ्या माश्याना बेड्या ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.
भरारी पथक आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सट्टा घेत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅटची संपूर्ण झडती घेतली. या झडती दरम्यान 17 मोबाईल हँडसेट, 2 लॅपटॉप, 1 नोटबुक, 1 हॉटमशीन, 14 हजार रुपयांची रोखड असा एकूण 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.