मुंबई : ‘जय भीम’ चित्रपटावर सोशल मीडियातून मोठी चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. आयएमडीबी या चित्रपटविषयक घडामोडींची माहिती देणाऱ्या साईटच्या रेटिंगवर पहिल्या क्रमांकावर ‘जय भीम’ आहे.
दुसऱ्या स्थानावर शॉशांक रिडम्पशन हा चित्रपट आहे. ‘जय भीम’चे दिग्दर्शन टी जे ज्ञानवेल यांनी केले आहे. तर यामध्ये साऊथस्टार सूर्यासह लिजो मोल, मनिकणन आणि प्रकाश राज यांनी भूमिका साकारल्या आहेत. सध्या ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे त्या जय भीम चित्रपटानं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून जय भीमनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाला जगातील सर्वात विश्वासू समजल्या जाणाऱ्या आयएमडीबी या चित्रपटविषयक घडामोडींची माहिती देणाऱ्या साईटनं सर्वाधिक गुण दिले आहेत.
आता यादीमध्ये ‘जय भीम’ हा सर्वाधिक गुण मिळवून आघाडीवर आहे. सोशल मीडियावरही यानिमित्तानं वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. सूर्या नावाच्या अभिनेत्यानं या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. तमिळ सुपरस्टार सूर्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे.
आयएमडीबीच्या रेटिंगवर पहिल्या क्रमांकावर जय भीम आहे. तर दुसऱ्या स्थानावर शॉशांक रिडम्पशन हा चित्रपट आहे. जो गेल्या काही वर्षांपासून आयएमडीबीच्या रेटिंगवर सर्वोच्च स्थानी होता. या यादीमध्ये सर्वोत्तम असे चित्रपट आहेत. त्यात गॉडफादरचाही समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पल्प फिक्शन आहे. लॉरेन्स ऑफ अरेबिया आहे. अ ब्युटिफुल माईंडही आहे. जय भीम हा एक कोर्ट ड्रामा आहे. ज्यामध्ये एका आदिवासी समुहावर होणारा अत्याचार, त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अमानुषतेची कहाणी सादर करण्यात आली आहे. मात्र ती ज्या पद्धतीनं सादर करण्यात आली आहे ती प्रेक्षकांना कमालीची भावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी जे ज्ञानवेल यांनी केले आहे.
सूर्या, लिजो मोल जोस आणि मनिकणन यांच्याही भूमिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली आहे. तमिळ भाषेतील ‘जय भीम’ या चित्रपटाला आयएमडीबीनं 9.6 असं रेटिंग दिलं आहे. तर शॉशांक रिडम्पशनला 9.3 असं रेटिंग आहे. त्यानंतर गॉडफादरचा समावेश आहे. या चित्रपटाला 9.2 रेटिंग देण्यात आले आहे. आयएमडीबीच्या अन्य टॉप 10 चित्रपटांची नावं सांगायची झाल्यास शिंडलर्स लिस्ट, द लॉर्ड ऑफ द रिंग्स, पल्फ फिक्शन आणि इन्सेपशनचा समावेश आहे.
जय भीम हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. त्यात एका वकिलाची कथा मांडण्यात आली आहे, ज्यांनी तळागाळातील पिडीतांना न्याय देण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली. हा चित्रपट हिंदी,तमिळ, तेलूगु आणि कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.