लखनौ : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भारताच्या फाळणीसाठी मुस्लिम जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. जिन्ना आणि काँग्रेसचे मोठे नेते भारताच्या फाळणीसाठी जबाबदार आहेत, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या सभेने जोर धरला आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे सभा घेत मोठे विधान केले. त्यातच असदुद्दीन ओवेसी यांनी फाळणीबद्दल केलेलं एक विधान चर्चेत आहे.यावेळी त्यांनी मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या पुस्तकाचा दाखला दिला. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना फाळणी हवी होती, असा उल्लेख आजाद यांच्या पुस्तकात असल्याचे ओवेसी यांनी म्हटले.
सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी मोहम्मद अली जिना यांना हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान केले असते तर फाळणी झालीच नसती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाच्या एका दिवसानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच फाळणीला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुरादाबादमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ओवैसी यांनी फाळणीला मुस्लीम नाही तर, मोहम्मद अली जिना आणि काँग्रेस नेतेच जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, ते म्हणाले की संघ आणि भाजपशी संबंधित लोक नीट वाचन करत नाहीत आणि फाळणीसाठी मुस्लिमांना दोष देतात.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, त्यावेळी नवाब किंवा पदवीधारकांसारख्या प्रभावशाली मुस्लिमांनाच मतदान करण्याची मुभा होती. भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या काळातील त्यांचे नेते जबाबदार होते, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, युपी पोलिसांवरही ओवेसींनी टीका केली. कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर ओवेसी यांनी टीका केली. ‘कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की, त्यांच्या मुलाने हुडीच्या तारेने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली, परंतु कासगंज पोलिसांनीच त्या युवकाला ठार मारले आहे. यूपी पोलिसांना तपास करणे माहीत नाही तर खून करणे माहीत असल्याचा आरोप केला.