Tuesday, June 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

1 कोटींचा बैल, वीर्य आहे महाग, 1 हजाराचा एक डोस

Surajya Digital by Surajya Digital
November 15, 2021
in Hot News, देश - विदेश, शिवार
0
1 कोटींचा बैल, वीर्य आहे महाग, 1 हजाराचा एक डोस
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बंगळूरू : कृष्णा नावाचा एक साडेतीन वर्षांचा बैल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या बैलाची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे. बंगळुरुच्या कृषी मेळाव्यात हा बैल सर्वांच्या केंद्रस्थानी होता. हा बैल हल्लीकर जातीचा आहे. त्याच्या वीर्याला खूप मागणी आहे. या बैलाच्या वीर्याचा एक डोस तब्बल 1 हजार रुपयाला विकला जातो, अशी माहिती या बैलाचे मालक बोरेगौडा यांनी दिली आहे.

बंगळुरूच्या कृषी प्रदर्शनात हा बैल आणण्यात आला आहे. अनेकजण त्या बैलासोबस सेल्फी काढून घेत आहेत. प्राण्यांच्या किंमती गेल्या काही महिन्यांपासून वाढल्या आहेत. मात्र या बैलाची किंमत ऐकल्यावर प्रत्येकालाच धक्का बसला आहे.

हल्लीकर जातीचा हा बैल असल्यामुळे त्याची किंमत तेवढी असल्याचं सांगण्यात येतं. हल्लीकर जातीच्या बैलाला बाजारात प्रचंड मागणी आहे. असा बैल सहसा मिळत नाहीत. त्यामुळे त्यासाठी लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार होतात. साडेतीन वर्षांचा हा बैल उमदा असून त्याच्या सीमेनला चांगली मागणी असल्याचं बैलाचे मालक सांगतात.

A 3.5 yr old bull named Krishna, valued at around Rs 1 Cr, has become centre of attraction at Krishi Mela in Bengaluru

Hallikar breed is mother of all cattle breeds. Semen of this breed is in high demand & we sell a dose of the semen at Rs 1000, said Boregowda, the bull owner pic.twitter.com/5cWZ5RW1Ic

— ANI (@ANI) November 14, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर याची काही छायाचित्रे शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. हल्लीकर जातीची सर्वच गुरे A2 प्रोटॉन असलेल्या दुधासाठी ओळखली जातात. आता ही प्रजाती हळूहळू नामशेष होत आहे. सध्या हा बैल एक कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रियाही येत आहेत.

बैलाचे मालक या बैलामुळे श्रीमंत झाले आहेत. या बैलाचे वीर्य अर्थात यांच्या सीमेनचा एक डोस ते 1 हजार रुपयांना विकतात. या सीमेनला बाजारात सर्वाधिक मागणी असते. त्यामुळेच या बैलाची किंमत प्रचंड वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या बैलाला पाहण्यासाठी दूरदूरच्या गावातून लोक गर्दी करत असून त्याची किंमत ऐकून आश्चर्यचकित होत आहेत. कृषी क्षेत्रात अधिकाधिक चांगल्या जातीचे बैल आणि गायी जन्माला येण्यासाठी हल्लीकर जातीच्या बैलांची संख्या वाढणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार असून दुग्धोत्पादनात देखील वाढ होणार आहे.

Tags: #1कोटी #बैल #वीर्य #महाग #हजाराचा #एकडोस#bull #1crore #semen #expensive #dose #thousand
Previous Post

बाबरला पुरस्कार न दिल्याने शोएब संतापला, हास्यास्पद ट्विट

Next Post

सोलापुरात फायनल मॅचमध्ये सट्टा, सहाजणांना अटक; शेटफळजवळ अपघात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्हीच्या प्रस्तावावर कार्यवाही होण्याची गरज

सोलापुरात फायनल मॅचमध्ये सट्टा, सहाजणांना अटक; शेटफळजवळ अपघात

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697