अकलूज : लावणी क्षेत्रात राज्याला भुरळ घालणारी अकलूज लावणी स्पर्धेतील कलाकार दुबई येथे पारंपारिक लावणी सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेची दुबईत सादरीकरण होणार ही महाराष्ट्राकरिता अभिमानाची बाब आहे.
अकलूज लावणी स्पर्धेमध्ये आपली कला सादर करून पारंपारिक लावणी जतन करणाऱ्या माया खुटेगावकर, प्रमिला लोदगेकर, पूनम कुडाळकर त्याचबरोबर गायिका प्राजक्ता महामुनी, ढोलकी पटू नितीन प्रधान हे कलावंत व त्यांच्याबरोबरसह कलावंत दुबई येथे होणाऱ्या सुखदा खांडगे कुणाल शेळके नितीन शिंदे दुबई येथे दिनांक 18 ते 23 नोव्हेंबर वीस एकवीस दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड एक्स प्रो 2020 या जागतिक प्रदर्शनामध्ये आपली कला सादर करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभाग तसेच मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदि लोककलेचे अभ्यासक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोंधळी गीत शाहिरी पोवाडे आदी पारंपारिक लोककला सादर होणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाहिरीच्या संयुक्त विद्यमाने अकलूज ते सलग पंचवीस वर्ष पारंपारिक लावणी स्पर्धा जयसिंह मोहिते पाटील हे आयोजित करत होते. या पंचवीस वर्षांमध्ये अनेक कलावंतांना परदेशात लावणी सादरीकरण करणे तसेच चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
अकलूज लावणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या माया खुटेगावकर तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार प्राप्त व अकलुज मधील लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रमिल लोदगेकर तसेच आपल्या आवाजाने स्पर्धा गाजवणाऱ्या प्राजक्ता महामुनी , लावणी कलावंत पूनम कुडाळकर, सृष्टी अंधारे, कुणाल शेळके याचबरोबर ढोलकीपटू नितीन प्रधान शिंदे यांचाही अकलूज लावणी स्पर्धेमध्ये सहभाग होता.
पारंपारिक लावणी जतन करण्याचे अकलूज हे केंद्रस्थान आहे, हीच परंपरा हे कलाकार पुढे नेत आहेत. याबद्दल या सर्व कलाकारांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन अकलूज लावणी स्पर्धेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील सचिव सुभाष दळवी यांनी केले आहे.