सोलापूर : बोपळे (ता.मोहोळ) येथील जि.प. शाळेतील कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलईडी, लॅपटॉप आणि प्रिंटर आदी ४५ हजाराचे साहित्य चोरून नेले. ही चोरी सोमवारी सकाळी उघडकीस आली .
बोपळे येथील शाळेला शनिवारी दुपारी सुट्टी होती. शाळेतील कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी घरी गेले होते. सोमवारी परतल्यानंतर त्यांना शाळेच्या कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर कुंडलिक गुंड (रा. अनगर ता.मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हवालदार साठे पुढील तपास करीत आहेत
* गोटेवाडी येथे रॉडने मारहाण; एक जखमी
गोटेवाडी (ता.मोहोळ) येथे शेतातील ऊस खरेदी करून पैशाच्या देण्या-घेण्याच्या वादातून लोखंडी रॉड काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत ज्ञानेश्वर अर्जुन चौगुले (वय ३६रा.गोटेवाडी) हे गंभीर जखमी झाले. ही घटना काल मंगळवारी रात्री जखमीच्या घरासमोर घडली. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब प्रभू शेळके, प्रभू शेळके, अमोल शेळके यांच्यासह सहा जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* उसने पैसे वसुलीवरुन अपहरणाची व चोरीची फिर्याद
बार्शी : उसने दिलेल्या पैशाच्या व्यवहारावरुन दोघाजणांनी परस्पराविरोधात अपहरण करुन मारहाण केल्याची व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे बार्शी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
धनाजी गुणवंत लंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते तालुक्यातील सुर्डी येथील रहिवाशी असून त्यांनी चार वर्षापूर्वी मालवंडी येथील शिवाजी व्हनमाने यांच्याकडून 30 हजार रुपये घेतले होते. ते सकाळी 10:00 वा. चे सुमारास गावातील सोनाली शेळके हिला परीक्षेसोठी कुर्डुवाडी येथे सोडण्यासाठी गेले होते.
तेथून परतत असताना मालवंडी बस थांब्याजवळ आले असता एका अनोळखी इसमाने थांबवून तु मला कट का मारला असे बोलुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तेंव्हा तेथेच उभा असलेला शिवाजी व्हणमाने याने त्यांना उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याने व त्याचेसोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी त्यांना उचलून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले. आणि माने यांच्या खडी क्रेशरच्या जवळ असलेल्या झाडीमध्ये नेवून, जर पैसे दिले नाहीत तर हातपाय बांधुन तळयात टाकुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
औदुंबर जालींदर व्हनमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मालवंडी येथील रहिवाशी असून शेतातल्या वस्तीवरून ते गावातील घराकडे गेले असता त्यांना दारात लावलेला न्यु हॉलन्ड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रक्टर नं- एमएच 19 बीजी 5259 हा दोन अनोळखी लोक घेवुन जात असताना दिसल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे गेले. त्यानंतर त्यांनी मुलगा शिवाजी याला फोन करुन सांगितल्यानंतर त्यांनी बस थांब्यावरील श्रीकांत बिडकर यांच्या पंक्चर काढण्याच्या दुकानाच्या समोर ट्रक्टर अडवला असता ट्रॅक्टर नेणारे दोघे हिसका देवुन पळुन गेले.
* दीराच्या मारहाणीत भावजय जखमी
सलगरवस्ती परिसरातील मधुकर उपलप वस्ती येथे पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दगडाने केलेल्या मारहाणीत तेजस्विनी सिद्धलिंग संदोळकर (वय ३०) ही महिला जखमी झाली. ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा दीर नरसिंग संदोळकर याने मारहाण केली. अशी नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली आहे .
* काठीने मारहाण; पत्नी जखमी
विडी घरकुल परिसरातील शिरालिंग नगरात घरातील किरकोळ भांडणातून प तीने काठीने केलेल्या मारहाणीत पार्वती शाम श्रीनाळे (वय३०) ही डोळ्याजवळ मार लागल्याने जखमी झाली. ही घटना मंगळवारी रात्री च्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा पती शाम श्रीनाळे याने मारहाण केली अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.