मुंबई : मुंबईच्या सत्र न्यायालयाने एका ३६ वर्षीय आरोपीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकरणातून मुक्त केले आहे. ‘होणाऱ्या पत्नीला काही आक्षेपार्ह मेसेज पाठवणे हे तिच्याशी असभ्य वर्तन होऊ शकत नाही, अशा पद्धतीचा संवाद दुसऱ्या व्यक्तीला एखाद्यावेळी पटणार नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, ते त्या व्यक्तीशी असभ्य वर्तन आहे,’ असे कोर्टाने म्हटले. यासंदर्भात २०१० मध्ये एफआयआर दाखल झाली होती.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने एका ३६ वर्षीय आरोपीला तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्त केलं आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केलं की, होणाऱ्या पत्नीला काही आक्षेपार्ह मेसेज पाठवणे हे तिच्याशी असभ्य वर्तन होऊ शकत नाही. विवाहपूर्व काळात एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी अशा पद्धतीचं संभाषण होत असतं असं यावेळी कोर्टाने सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लैंगिक भावना जागृत करण्यासाठी आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीचा संवाद दुसऱ्या व्यक्तीला एखाद्यावेळी पटणार नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, ते त्या व्यक्तीशी असभ्य वर्तन आहे.
महिलेने २०२० मध्ये तक्रार केली होती. हे जोडपं २००७ मध्ये मॅट्रिमोनिअल साइटवर भेटले होते. घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीची आई या लग्नाच्या विरोधात होती. लग्नानंतर तुम्हाला घरात राहू देणार नाही, असं त्याच्या आईने सांगितल्यामुळे २०१० मध्ये त्यांनी संबंध संपवले. दरम्यान, बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, लग्न करण्याच्या प्रत्येक वचनाचं पालन न करण्याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही.