सोलापूर : वडिलांची दुचाकी पंक्चर झाल्यामुळे आईसोबत रस्त्यावर थांबलेली नऊ वर्षाची बालिका वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेने गंभीर जखमी होऊन मरण पावली. हा अपघात रविवारी (ता. २१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील चिंचोळी पॉवरग्रेड जवळ घडला.
श्रुती मडोळप्पा माकणे (वय ९ वर्षें रा. शेळगी, शिवगंगा नगर सोलापूर) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. ती आज सकाळी आई-वडील आणि लहान भावासोबत अक्कलकोट येथे आत्याच्या घरी कार्यक्रमासाठी निघाली होती. चिंचोळी जवळ वडिलांची दुचाकी पंक्चर झाली त्यामुळे वडिलांनी श्रुती तिची आई ( महादेवी) आणिभाऊ ( सोमनाथ) यांना पॉवर ग्रेड जवळ थांबवून पंक्चर काढण्यासाठी गेले होते.
त्यावेळी सोलापूरहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारी दुचाकी वेगाने येऊन धडकल्याने श्रुती माखणे ही गंभीर जखमी झाली. तिला त्वरीत अश्विनी त्यानंतर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती दुपारच्या सुमारास मरण पावली. श्रुती माखणे ही तिसरी इयत्तेत शिकण्यास होती. तिचे वडील हे दर्शनाळ येथे शेती करतात.
मयत श्रुतीच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार ज्योतिबा पवार हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* हिरज येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – हिरज ( ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या आकाश महादेव शिंदे (वय १९) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास घडली.
रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. तो मजुरी करीत होता. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार सावळे पुढील तपास करीत आहेत.
* दर्गनहळळी येथे ट्रॅक्टरच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर – वेगाने जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेने पादचारी इसम ठार झाला. हा अपघात दर्गनहळळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे शनिवारी (ता. २०) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.
प्रदीप धुळप्पा दुपारगुडे (वय ४२ रा. दर्गनहळ्ळी) असे मयताचे नाव आहे. ते काल रात्री गावात शौचासाठी गेले होते. तेथून परत येत असताना ट्रॅक्टरच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.