नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मोठं विधान केलं. कारकीर्दीतील घरच्या मैदानावरील अखेरचा एकदिवसीय सामना मी रांची येथे खेळलो. त्यामुळे आता अखेरचा ट्वेन्टी-20 सामना चेन्नईच्या जर्सीत चेपॉकवर खेळायला आवडेल, असं धोनीने म्हटलं. तसेच तो यावर्षी होईल किंवा सामना पुढील पाच वर्षांत कधीही येऊ शकतो, असंही तो म्हणाला.
कारकीर्दीतील घरच्या मैदानावरील अखेरचा एकदिवसीय सामना मी रांची येथे खेळलो. त्यामुळे आता अखेरचा ट्वेन्टी-20 सामना चेन्नईच्या जर्सीत चेपॉकवर खेळायला आवडेल, असं धोनीने म्हटलं. तसेच तो यावर्षी होईल किंवा सामना पुढील पाच वर्षांत कधीही येऊ शकतो, असंही तो म्हणाला.
दरम्यान, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी महेंद्रसिंह धोनीला विशेष संदेश देऊन चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची मने जिंकली. या समारंभात बोलताना एमके स्टॅलिन म्हणाले, “प्रिय महेंद्रसिंह धोनी, तू अनेक सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. धोनी तू झारखंडचा आहेस पण आमच्यासाठी, तामिळनाडूच्या लोकांसाठी तू आमच्यापैकी एक आहेस”. मी येथे तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर धोनीचा चाहता म्हणून आलो आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केवळ मीच नाही तर येथे उपस्थित असलेली माझी नातवंडेही त्याचे चाहते आहेत. माझ्या दिवंगत वडिलही धोनीचे चाहते होते. मी धोनीला आवाहन करतो की, आता निवृत्तीचा विचार करू नका कारण आम्हाला त्याला पुढील अनेक वर्षे चेन्नईच्या कर्णधारपदी पहायचे आहे. अशी भावना व्यक्त करत स्टॅलिन यांनी धोनीला चेन्नईच्या कर्णधारपदी कायम राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात, स्टॅलिन यांच्यासह बीसीसीआयचे सचिव जय शाह, एन श्रीनिवासन, कपिल देव आणि अन्य खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.
आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. धोनी किती दिवस आयपीएलमध्ये खेळणार याबाबत कोणालाच माहिती नाही.
मात्र, धोनीने या झालेल्या समारंभात त्याच्या खेळाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंह धोनीने आपला शेवटचा टी-२० सामना चेन्नईत होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा अनुभवी खेळाडू पुढील मोसमातही चेन्नईकडून खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.