नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला मोठा धक्का बसला आहे. एका महिन्यात 1.9 कोटी युझर्सनी जिओला रामराम केला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आकडेवारी दिली आहे. रिलायन्स जिओने सप्टेंबर महिन्यात 1.9 कोटी कनेक्शन गमावले आहेत. तर दुसरीकडे एअरटेलने 2.74 लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. Vi चेही 10.77 लाख युझर्स कमी झाले आहेत.
सप्टेंबर 2021 महिन्यात 1.9 कोटी ग्राहकांनी रिलायन्स जिओची सेवा बंद केली. दुसरीकडे, जिओची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलने या दरम्यान 2.74 लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले. वोडाफोन आयडियाच्या कनेक्शनमध्येही 10.77 लाखांची घट झाली, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीतून समोर आली आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष किरण थॉमस आहेत. थॉमस म्हणाले होते की, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कोरोनामुळे सर्वसामांन्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. यादरम्यान आम्ही यूझर्स आमच्याशी जोडले जावोत यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यूझर्सन अधिक बोलता यावं यासाठी आम्ही काही मिनिटं मोफत दिली होती. मात्र अनेक यूझर्स हे या काळात रिचार्जबाबत सजग राहिले नाहीत. पॉलिसीनुसार कंपनीने जवळपास 90 दिवस याचा डेटाबेस राखून ठेवला होता. या यूजर्सचा परिणाम एकूण ग्राहक संख्येवर दिसून येतोय. या कारणामुळेच या तिमाहीत घसरण दिसून येत आहे, असंही थॉमस यांनी म्हटलंय.
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या सप्टेंबर पर्यंत 42.48 कोटी मोबाइल ग्राहक होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात त्यांनी 1.9 कोटी कनेक्शन गमावले. या दरम्यान, एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 35.44 कोटी झाली. जी ऑगस्ट मध्ये 35.41 कोटी होती. तसेच वोडाफोन आयडिया कनेक्शन मध्ये 10.77 लाख घसरण झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स जिओ ने सप्टेंबर मध्ये तिमाहीत परिणामांची घोषणा करताना ग्राहकांच्या संख्येत घसरण होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण वायरलेस कनेक्शनची संख्या कमी होवून ती 116.60 कोटी वर पोहोचली आहे. ही आकडेवारी ऑगस्टमध्ये 118.67 कोटीवर होती.
* व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्स महागणार
25 नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्स महाग होतील. व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लान्सचे दर 25 टक्क्यांनी वाढवणार आहे. त्याआधी एअरटेलनं प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आता व्होडाफोन आयडियानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं आहे.
प्रती ग्राहक महसूल (एआरपीयू) वाढवण्याचा व्होडाफोन आयडियाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कंपनीनं 25 नोव्हेंबरपासून प्रीपेड प्लानचे दर 25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे 11 मोबाईल फोन प्लान्स आणि चार डेटा पॅकेजेसचा दर जवळपास 20 टक्क्यांनी वाढणार आहे. व्होडाफोन आयडियाची स्पर्धक कंपनी असलेल्या एअरटेलनं कालच 20 ते 25 टक्क्यांची दरवाढ जाहीर केली. एअरटेलचे नवे दर 26 नोव्हेंबरपासून लागू होतील.