मुंबई : राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम आहे, असे अभिनेत्री ऋचा चढ्ढाने म्हटले आहे. राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक बनल्यानंतर आता आपण पुन्हा क्रिकेट पाहणे सुरु करणार, असेही ती म्हणाली.. याआधी द्रविड खेळत असताना मला क्रिकेट पाहणे आवडत होते, पण द्रविडने निवृत्ती घेतली आणि मी क्रिकेट पाहणे बंद केले, असे ऋचाने सांगितले. दरम्यान राहुल द्रविडने कोच म्हणून पहिल्याच मालिकेत विजय मिळवला आहे.
राहुल द्रविड भलेही सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. पण त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीने खुलासा केला की, राहुल द्रविड हा तिचं पहिलं प्रेम आहे. ऋचा चड्ढा ने द टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितलं की, आता ती क्रिकेट जास्त फॉलो करत नाही. पण कधी कधी राहुल द्रविडला बघण्यासाठी मॅच बघत होती.
द्रविडने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत शक्य त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. कर्णधारपासून ते किपर पर्यंत सर्वच क्षेत्रात त्याने आपलं योगदान दिले. निवृत्त झाल्यानंतरही त्याने आधी युवा भारतीय संघाला क्रिकेटचे धडे दिले. आता विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला प्रशिक्षण देण्यात तो व्यस्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऋचा चड्ढा म्हणाली की, जेव्हा राहुल द्रविडने रिटायरमेंट घेतली, तेव्हापासून तिने क्रिकेट बघणं बंद केलं होतं. ती म्हणाली की, ‘बालपणी मी क्रिकेटची फार मोठी फॅन नव्हते. माझा भाऊ क्रिकेट खेळत होता. एक वेळ होती जेव्हा मी टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत होते. मला राहुल द्रविडला खेळताना बघणं खूप आवडत होतं. जेव्हापासून त्याने क्रिकेट खेळणं सोडलं, तेव्हापासून मी क्रिकेट फॉलो करणं सोडलं. माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड आहे’.
ऋचा चढ्ढा तिच्या आगामी शो इनसाइड एज ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे जो क्रिकेटरवर आधारित आहे. श्रीमंत एक मुलाखतीत संगितले की, तीन कधीही स्पोर्ट्सला फारसे फॉलो केला नाही. पण जेव्हा क्रिकेट टीव्हीवर यायचे. तेव्हा ती एक कारण सांगून मॅच बघायची. अभिनेत्री म्हणाली- मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या क्रिकेटची मोठी फॅन नव्हते.
ऋचा चड्ढा आणि अली फजल २०१२ मध्ये पहिल्यांदा त्यांच्या ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि दोघांमध्ये एकमेकांच्या प्रेम वाढत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. ऋचा चढ्ढा आणि अली फजल २०२० मध्ये एप्रिल महिन्यात लग्न करणार होते. मात्र, कोरोना महामारीमुळे दोघांनी त्यांचे लग्न लांबणीवर टाकले. आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.