सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेली माढा व माळशिरस नगरपंचायत, नव्याने निर्माण झालेली महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान होऊन दुस-या दिवशी 22 डिसेंबरला निकाल लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील 105 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
“जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता फक्त त्या नगरपंचायत हद्दीत पुरतीच असणार आहे. या पाच नगरपंचायतीच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याचे मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी) यांनी सांगितले.
राज्यातील 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 21 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. दुस-या दिवशी 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी यासंदर्भातील आज घोषणा केली असून आचारसंहिता लागू झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यातील या पाच नगरपंचायतींसाठी 29 नोव्हेंबरला प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 30 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 8 डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 13 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी 22 डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे. जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या अनगर (ता. मोहोळ) वगळता सर्वच नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील जुन्या 10 नगरपरिषदा (पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, कुर्डूवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ) व नव्याने झालेल्या अकलूज नगरपरिषदेसोबत अनगरची निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
* निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
– अर्ज दाखल करणे : 1 ते 7 डिसेंबर
– अर्जांची छाननी : 8 डिसेंबर
– मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
– निकाल : 22 डिसेंबर
* सराफाचे ८ लाखाचे दागिने घेऊन पश्चिम बंगालचा कामगार पसार
सोलापूर : पॉलिश करण्यासाठी दिलेले ७ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन कामगार पसार झाला. ही घटना पंढरपूर येथील समर्थ अलंकार या दुकानात घडली. या प्रकरणात पंढरपूर शहर पोलिसांनी पश्चिम बंगालच्या एका कामगारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
पंढरपूर येथील महेश तानाजी करंडे या सराफ व्यापाऱ्यांनी रहीम सय्यद शेख (वय ३० रा. टाकळीरोड पंढरपूर, मूळ रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) या कामगाराला नेहमीप्रमाणे १९३ ग्रॅम सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी २६ जूनला दिले होते. त्यानंतर तो टाळाटाळ करीत पंढरपूर सोडून गायब झाला. आपली फसवणूक झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर महेश कारंडे यांनी पंढरपूर शहर पोलीसात फिर्याद दाखल केली. सहाय्यक निरीक्षक निलेश बागाव पुढील तपास करीत आहेत.