मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यातचं आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, येत्या 2 वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किंमती पेट्रोलवर चालणाऱ्या कार्सएवढ्याचं होतील. तसेच लवकरचं या क्षेत्रात क्रांती होणार आहे. इलेक्ट्रिक गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च येतो. सरकार EV (इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय) चार्जिंग सुविधा वाढवण्याचाही विचार करत आहे, असंही ते म्हणाले.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या FY21 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) गडकरी बोलत होते.सरकार EV चार्जिंग सुविधा वाढवण्याचाही विचार करत आहे, असंही ते म्हणाले. ‘2023 पर्यंत प्रमुख राज्यमार्गांवर 600 EV चार्जिंग पॉईंट उभे केले जाणार आहेत. इतकंच नाही, तर सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या नवीन उर्जास्रोतांवर चालणारी चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याबद्दलही सरकार विचार करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सतत नवनव्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत. अजून तरी या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय चांगला असला, तरी त्या घेण्याची सर्वसामान्यांची हिंमत होत नाही. आता मात्र हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या कार्सएवढ्याच होतील, असं गडकरी म्हणाले आहेत. याचाच अर्थ आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी होतील असे संकेत गडकरींनी दिले आहेत. लवकरच या क्षेत्रात क्रांती होणार आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
‘पेट्रोलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान 10 रुपये, डिझेलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान सात रुपये, तर विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च येतो,’ असं ते म्हणाले. अर्थातच हे सगळं चित्र आशादायी वाटतं. गॅसोलिन आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल आणि सीएनजीसारख्या पर्यायी इंधनांचा वापर केला जावा यावरही गडकरींनी भर दिला.
सध्या EV ची संख्या कमी असल्याने त्यांच्या किंमती जास्त आहेत. भारतात आता EV क्रांती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. यासाठी 250 स्टार्टअप व्यवसाय EV उपलब्ध आहेत. त्याशिवाय देशातले प्रमुख वाहन निर्माते इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी झाले आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी (GST) 5 टक्के आहे आणि लिथियम-आयन बॅटरीच्या किमतीही कमी होऊ लागल्या आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.