मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. अभिनेता सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवासोबत सोनाक्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या.
सोनाक्षी आणि बंटी सचदेवा लवकरच एंगेजमेंट करणार आहेत, मात्र अजूनपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा ही सलमान खानच्या परिवारातील एका सदस्याशी अगदी जवळ आहे, तसेच त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. सलमान खानच्या परिवारातील या सदस्याचे नाव बंटी असे आहे. सोनाक्षी आणि बंटी यांच्या लग्नाची तयारी चालू झाली आहे. बंटी हा सलमानचा छोटा भाऊ सोहेल खानचा मेव्हणा आहे. सोनाक्षी आणि बंटी यांची खूप चांगली मैत्री आहे, अनेकवेळा ते एकत्र स्पॉट होतात.
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते की, जेव्हा ती शाळेत होती तेव्हा तिला खरे प्रेम झाले होते. परंतु ग्रॅजुएशन पूर्ण होताच तिचे ब्रेकअप झाले. तिने सांगितले की, हे रिलेशन तिने खूप सिरिअसली घेतले होते. ती पूर्ण पाच वर्ष रिलेशनमध्ये होती. परंतु सोनाक्षीने त्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही. तरी देखील आता सगळेजण असा अंदाज लावत आहेत की, तो मुलगा इतर कोणी नाहीतर बंटी सचदेवा हा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोनाक्षी आणि बंटीची खूप चांगली बॉंडिंग आहे. अनेक पार्टीमध्ये ते दोघे एकत्र स्पॉट होतात. एका मुलाखतीत सोनाक्षीने बंटीचे खूप कौतुक केले होते. तिचे असे म्हणणे आहे की, बंटी त्याची प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत असतो. सोनाक्षी सलमान आणि त्याच्या कुटुंबाशी खूप जवळ आहे. सलमान खानचे वडील सलीम खान आणि शत्रुघन सिन्हा खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे आता बंटी आणि सोनाक्षी लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या येत आहेत.
सोनाक्षी आणि बंटी यांच्या लग्नाची तयारी चालू झाली आहे. बंटी हा सलमानचा छोटा भाऊ सोहेल खानचा मेव्हणा आहे. सोनाक्षी आणि बंटी यांची खूप चांगली मैत्री आहे, अनेकवेळा ते एकत्र स्पॉट होतात. एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते की, जेव्हा ती शाळेत होती तेव्हा तिला खरे प्रेम झाले होते. परंतु ग्रॅजुएशन पूर्ण होताच तिचे ब्रेकअप झाले. तिने सांगितले की, हे रिलेशन तिने खूप सिरिअसली घेतले होते. ती पूर्ण पाच वर्ष रिलेशनमध्ये होती.
परंतु सोनाक्षीने त्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही. तरी देखील आता सगळेजण असा अंदाज लावत आहेत की, तो मुलगा इतर कोणी नाहीतर बंटी सचदेवा हा आहे. तसेच सोनाक्षी आणि बंटीची खूप चांगली बॉंडिंग आहे. अनेक पार्टीमध्ये ते दोघे एकत्र स्पॉट झाले असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.