सोलापूर : राज्यात गेल्या २ वर्षात आघाडी सरकारच्या काळात दिनदलित आणि महिलांवरील अत्याचार, अन्यायाची परिसीमा गाठली आहे, असा आरोप भाजप माजी खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात आज केला.
अमर साबळे आज सोलापूर दौ-यावर होते. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अमर साबळे म्हणाले, राज्यात अनुसूचित जाती- जमाती आयोग कार्यरत नाही. अन्यायग्रस्तांना न्यायही मिळत नाही. मागासवर्गीयांच्या पदोन्नतील आरक्षण रोखण्यात आलं आहे. अनुसूचित जाती जमातीवर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत चालले असल्याचा आरोप करत आघाडी सरकारला सरकारने अनुसूचित जाती जमाती वरील अन्याय अत्याचार दूर करावे याबाबत बोलताना अमर साबळे यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका केली आहे.
‘महाविकास आघाडीमधील मंत्र्यांची लफडी बाहेर येत चालली आहेत आणि मुख्यमंत्री त्यांची झाकपाक करण्यात व्यस्तं आहेत. त्यामुळेच अनुसूचित जाती-जमातीला दोन वर्षे अध्यक्ष मिळालेला नाही.’ असे टीकेचे बाण साबळे यांनी सोडले आहेत.
महाराष्ट्रातील सामाजिक मंत्र्यांची रंगीन प्रकरणे समाजासमोर येत चाललेली आहेत. रंगीन प्रकरणांमध्ये समाजकल्याणमंत्री व्यस्त आहेत. मुख्यमंत्री या पक्षाला सांभाळ, त्या पक्षाला सांभाळ. यातच व्यस्त आहेत.’,’वेगवेगळ्या मंत्र्यांची लफडी बाहेर येत चाललेली आहेत. त्यांची झाकपाक करण्यात मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाला अध्यक्ष नाही.’ ‘अनुसूचित जाती जमातीवर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत चालले असल्याचा आरोप करत आघाडी सरकारला सरकारने अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचार दूर करावेत.’ असं आवाहनही यावेळी माजी खासदार अमर साबळे यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झालेले आहे. हा दोन वर्षाचा कार्यकाळ म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे दोन वर्षाचे अन्याय पर्व आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि शोषित , पीडित, वंचित समाजावर अन्याय, अत्याचार होत असताना त्या अन्याय निवारणाकडे दुर्लक्ष करायचं काम आणि पाप या सरकारने केलं आहे.’
‘अनुसूचित जाती जमातीला दोन वर्षे अध्यक्ष मिळाला नाही. त्या आयोगाची योग्य मनुष्यबळ आणि निधीची तरतूद नाही. त्यामुळे काम थंड झालेलं आहे. पदोन्नोत्तीतील आरक्षण, अनुसूचित जाती जमातीला जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती वर्गामध्ये प्रचंड संताप आणि उद्रेक आहे.’
यामुळेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत.’ असा इशारा माजी खासदार अमर साबळे यांनी सरकारला दिला आहे.
* खासदार जयसिद्धेश्वरांचा विषय येताच साबळे गडबडले
सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे खासदार जयसिध्देश्वर स्वामी यांनी जातीचा बोगस दाखला सादर केला आहे. हा खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय नाही का? या प्रश्नावर मात्र अमर साबळे गडबडले. त्यांनी ही बाब न्यायालयात असल्यानं आपण काही बोलणार नाही असा पावित्रा घेतला. स्वतः आपण लोकसभेसाठी इच्छुक होता, तुमच्यावरही हा अन्याय आहे असं वाटत नाही का? या प्रश्नावरही त्यांनी सारवासारव भूमिका घेतली.
साबळे म्हणाले, मी मागीलवेळी लोकसभेसाठी इच्छूक नव्हतो, यंदाही इच्छूक नाही. मला पक्षानं सोलापूर प्रभारीची जबाबदारी दिली होती. यंदाही कोणतीही जबाबदारी देवो ती मी स्विकारेल, असे सांगितले.