मुंबई : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपला राष्ट्रीय पातळीवर सक्षम पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासंदर्भातील ही चर्चा होती, असे या बैठकीनंतर सांगण्यात आले. तसेच नेतृत्व कोण करेल, हा नंतरचा मुद्दा आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक उपस्थित होते. आधी पश्चिम बंगालपुरतं मर्यादित मानल्या गेलेल्या ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच, राज्याबाहेरील राजकीय हालचाली वाढवल्या आहेत.
दरम्यान बॅनर्जी यांनी काल सोमवारी आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. भाजपला राष्ट्रीय पातळीवर सक्षम पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासंदर्भातील ही चर्चा होती, असे पवार यांनी या बैठकीनंतर सांगितले. तसेच नेतृत्व कोण करेल, हा नंतरचा मुद्दा आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीनंतर शरद पवारांनी ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याविषयी त्यांचं अभिनंदन केलं. “ममता बॅनर्जी यांच्या इथे येण्याच्या मागे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत. अनेक साधर्म्य या दोन राज्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली आहे.
Maharashtra: West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar in Mumbai today. pic.twitter.com/jW7XkPrv20
— ANI (@ANI) December 1, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना भेटू शकले नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली”, असं शरद पवार यांनी सांगितलंय. नेतृत्त्व महत्त्वाचं नाही. कुणाच्या नेतृत्वात एकत्र यायचं, यापेक्षा भाजपविरोधात ताकदीनं उभं राहण्याची गरज आम्हाला वाटते,” असही शरद पवार यांनी आवर्जून सांगितलंय.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करण्याचा विचार मांडला होता. यासाठी त्या देशातील विविध राज्यांचा दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी महाराष्ट्रात मुंबई दौरा करत असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे नेते आणि गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यालाच पक्षात घेत तिथल्या आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनं तृणमूल उतरताना दिसत आहे. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, फॅसिस्टविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं, ममता बॅनर्जींनी यूपीएबद्दल विचारलं असता, त्यांनी भुवया उंचावणारे उत्तर दिले, “काय आहे यूपीए? आता यूपीए नाहीय, असे स्पष्टपणे उत्तर दिले.
आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे पण हे कोणा एकट्याचे काम नाही. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, पण काँग्रेस लढायला तयार नाहीत तर काय बोलायचे. सगळ्यांना सोबत घेतल्या शिवाय लढाई कशी शक्य आहे असे देखील त्या म्हणाल्या. भाजप विरोधात पर्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच तिसरी आघाडी शक्य असल्याचे सुतोवाच ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
तृणमूल कांग्रेस आणि विशेषतः ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं देशातील इतर राज्यांमध्ये पाय पसरण्याची घाई करत आहेत, त्यावरून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे जाणवत आहे.