मुंबई : दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर केली. तर भारताकडून अश्विनने ४, सिराजने ३, अक्षर पटेलने २ विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा संघ २६३ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपला. मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस रोमांचकारी राहिला.
भारताविरुद्ध कसोटी सामन्यातली न्यूझीलंडची ही आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. संपूर्ण न्यूझीलंड संघात सलामीवीर टॉम लॅथम आणि अखेरच्या फळीत काएल जेमिन्सन हे दोनच फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले. याव्यतिरीक्त अन्य सर्व फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली.
मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताच्या पहिल्या डावात सर्व दहा फलंदाजांना बाद केले. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एजाज तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या जीम लेकर यांनी १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळेने १९९९ मध्ये पाकिस्तानच्या सर्व १० फलंदाजांना केले होते.
आज न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मोठा इतिहास रचला आहे. त्याने भारताविरुद्ध वानखेडेवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व १० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
एजाज पटेलने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात ११९ धावा देत १० विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने भारताच्या १० क्रिकेटपटूंपैकी ती जणांना तर शुन्यावर माघारी धाडले.
Innings Break!
A session dominated by #TeamIndia as New Zealand are all out for 62 runs.
Scorecard – https://t.co/CmrJV47AeP #INDvNZ @Paytm pic.twitter.com/8Pg9fVkFmN
— BCCI (@BCCI) December 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्व १० विकेट्स घेणारा एजाज हा १५० वर्षांच्या इतिहासातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम अनिल कुंबळे आणि जिम लेकर यांनी केला होता.
इंग्लडचे गोलंदाज लेकर यांनी अशी कामगिरी सर्वप्रथम केली होती. त्यांनी १९५६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या डावात ५३ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अनिल कुंबळेने दिल्लीमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्याच्या चौथ्या डावात ७४ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय एजाज हा सामन्याच्या पहिल्या डावात १० विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
एजाजबद्दल खास गोष्ट म्हणजे तो भारतीय वंशाचा गोलंदाज आहे. त्याचा जन्म मुंबई शहरात झाला होता. पण, वयाच्या ८ व्या वर्षी तो त्याच्या पालकांसह न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. योगायोग म्हणजे एजाजने एका कसोटी डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याच्याच जन्मस्थळ असलेल्या मुंबई शहरात केला आहे.
पहिल्या डावात टीम इंडिया ३२५ धावांवर बाद झाली. पाहुण्या न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने डावातील सर्व १० बळी घेत इतिहास रचला. तर दुसरीकडे ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट घेत पाहुण्या संघाचा अवघ्या ६२ धावांत गाशा गुंडाळला. किवी संघाच्या एकाही खेळाडूला विकेटवर उभे राहण्याचे धाडस दाखवता आले नाही. अश्विन ४, सिराज ३, अक्षर पटेल २, जयंत यादव १ ने विकेट घेतली. भारतीय संघाने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने विल यंगला (४) कॅप्टन कोहलीने झेलबाद केले. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने टॉम लॅथमची (१०) विकेट घेतली. सिराज इथेच थांबला नाही आणि त्याच्या पुढच्याच षटकात रॉस टेलरला (१) क्लीन बोल्ड केले. या तीन विकेट या युवा वेगवान गोलंदाजाने अवघ्या १३ चेंडूत घेतल्या. डॅरिल मिशेलला (८) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडची चौथी विकेट अक्षर पटेलने घेतली.
१४ व्या षटकात आर अश्विनने पहिल्याच चेंडूवर हेन्री निकोल्स (७) याला बाद करून किवी संघाची ५ वी विकेट मिळवली. ५ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जयंत यादवनेही आपल्या पहिल्याच षटकात रचिन रवींद्रची (४) विकेट घेतली. टी-ब्रेकनंतर अश्विनने टॉम ब्लंडल (८) आणि टीम साऊथी (०) यांना बाद करत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. विल सोमरव्हिलची (०) विकेटही अश्विनने घेतली. किवी संघाचा ऑलआऊट करण्याचे काम अक्षर पटेलने केले. त्याने काईल जेमिसनला (१७) बाद करून त्यांच्या डावाचा शेवट केला.