Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

स्काऊट- गाईड कोट्याअंतर्गत रेल्वेभरती; सोलापूर विभागात रेल्वेत साखळी खेचण्याच्या 149 घटना

Surajya Digital by Surajya Digital
December 4, 2021
in Hot News, अर्थाअर्थ, सोलापूर
2
स्काऊट- गाईड  कोट्याअंतर्गत रेल्वेभरती; सोलापूर विभागात रेल्वेत साखळी खेचण्याच्या 149 घटना
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मध्य रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (Railway Recruitment Cell) स्तर 1 आणि 2 पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणा-या युवकांसाठी ही चांगली संधी आहे.

इच्छुक उमेदवार RRC च्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण त्यासाठीची पात्रता जाणून घ्या.

स्तर 1 साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. किंवा ITI प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.

स्तर 2 साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. दुसरीकडे, SC / ST / सैनिकांच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुणांची सूट आहे. याशिवाय, तांत्रिक पदासाठी, एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त अप्रेंटिसशिप ऍक्‍ट किंवा ITI प्रमाणपत्र असावे. तर उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी, ही अट आहे.

अर्ज प्रक्रिया 6 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल. या भरती प्रक्रियेतून 12 पदे भरली जाणार आहेत. 2021-22 या वर्षासाठी स्काऊट- गाईड कोट्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागासाठी स्तर 1 आणि 2 ची पदे भरली जातील.

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC / ST / PWD व महिला उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपये आहे.

* सोलापूर विभागात रेल्वेत साखळी खेचण्याच्या 149 घटना

रेल्वेत अलार्म चैन (साखळी) खेचण्याचा पर्याय केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येतो. परंतु, प्रवासी या सुविधेचा गैरवापर करीत असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. मागील 23 महिन्यांत क्षुल्लक कारणांसाठी जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2021 मध्ये साखळी खेचण्याच्या जवळपास 149 घटना सोलापूर विभागात घडल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत जवळपास 23 महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांची नोंद रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सर्व प्रकरणे ही मेल-एक्‍सप्रेसमधील असल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विनाकारण साखळी खेचणाऱ्या प्रवाशांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. तर काहीजणांना शिक्षादेखील करण्यात आली आहे.

मेल- एक्‍सप्रेसमध्ये क्षुल्लक कारणासाठी चैन खेचण्याच्या घटना घडल्या आहेत. आगामी काळात अशा प्रकारच्या घटना कमी करण्यासाठी आरपीएफ पथकाची नियुक्त करण्यात आली असल्याचे प्रदीप हिरडे (वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर) यांनी सांगितलंय.

त्यामुळे विनाकारण साखळी खेचाल तर यापुढे एक वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली. रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार, चैन पुलिंग करताना पकडले गेल्यास, जास्तीत जास्त एक हजार रुपये दंड किंवा एक वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. साधारणपणे दंडाधिकारी केवळ 500 रुपये दंड भरून आरोपीला सोडतात. दंड न भरल्यास केवळ नाममात्र प्रकरणांमध्ये एक महिना कारावास भोगावा लागतो.

विनाकारण चैन खेचणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष पथक तैनात असते. वैद्यकीय, वीज, पाणी, स्वच्छतागृह सेवा नसणे यासाठी साखळी ओढली तर शिक्षा नाही, मात्र हे सुनावणी दरम्यान सिध्द झाले पाहिजे.

Tags: #Railway #recruitment #scout-guide #quota #incidents #chain #pulling #Solapur#स्काऊट-गाईड #कोट्याअंतर्गत #रेल्वेभरती #सोलापूर #विभाग #साखळी #खेचण्याच्या #घटना
Previous Post

भारतात आणखी एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला ! कर्नाटकानंतर गुजरातमध्ये शिरकाव

Next Post

माऊलींच्या मुखकमलावर किरणोत्सव, खगोलशास्त्रज्ञांनाही झाले अश्रू अनावर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
माऊलींच्या मुखकमलावर किरणोत्सव, खगोलशास्त्रज्ञांनाही झाले अश्रू अनावर

माऊलींच्या मुखकमलावर किरणोत्सव, खगोलशास्त्रज्ञांनाही झाले अश्रू अनावर

Comments 2

  1. The Metamask Chrome extension gives you 2022 tokens in honor of the upcoming new year. says:
    6 months ago

    ❤️ Metamask Chrome want to meet you! Click Here: https://bit.ly/3Dkhxtz ❤️

  2. Elizabeth Walton says:
    4 months ago

    This will be the right weblog for desires to discover this topic. You realize so much its practically challenging to argue along with you (not too I personally would want…HaHa). You actually put a whole new spin with a topic thats been discussing for many years. Fantastic stuff, just wonderful!

वार्ता संग्रह

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697