औरंगाबाद : ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणजे पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची तिथी 2 डिसेंबर रोजी होती. राज्यभरात पावसामुळे ढगाळलेले वातावरण असताना फक्त माऊलींच्या समाधीच्या क्षणांना काही मिनिटे दाटलेल्या ढगांतून सूर्य उगवला आणि माऊलींच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली.
कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास इंद्रायणी काठी समाधी घेतली होती. किरणोत्सवाचे दर्शन झाल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसला तर विज्ञानाच्या सखोल अभ्यासानंतर जुळून आलेल्या किरणोत्सवानंतर खगोलशास्त्रज्ञांनाही अश्रू अनावर झाले.
माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याची तिथी 2 डिसेंबर रोजी होती. अवघ्या जगाला विज्ञान आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी आपेगावातील भाविकांना विज्ञानाची मोठी अनुभूती आली.
सध्या राज्यभरात पाऊस आणि ढगाळलेले वातावरण असताना फक्त आणि फक्त माऊलींच्या समाधीच्या क्षणांना काही मिनिटेच दाटलेल्या ढगांतून सूर्य उगवला आणि माऊलींच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली. ज्ञानेश्वर माऊलींनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास इंद्रायणी काठी समाधी घेतली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तीच वेळ साधत आपेगाव येथील मंदिरातही माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडावीत, यासाठी वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ गेल्या दोन वर्षांपासून सूर्यकिरणे आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अभ्यास करीत आहेत.
त्यानुसार तयार केलेल्या यंत्रणेला गुरुवारी समाधीच्या क्षणांना यश येईल की नाही, याबाबत साशंकता होती. कारण मागील आठवडाभरापासून औरंगाबादसह मराठवाड्यात कुठेही सूर्यदर्शन झाले नव्हते. पण संजीवन समाधीच्या वेळी अगदी चार मिनिटे ढगाळलेल्या वातावरणातही सूर्य डोकावला आणि माऊलीच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली.
हा किरणोत्सव पाहून माऊलींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही तर तो घडवून आणण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून अथक परिश्रम करणारे वास्तुशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांनाही अश्रू अनावर झाले. हा किरणोत्सव पाहून माऊलींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
संजीवन समाधी क्षणांना झालेल्या किरणोत्सवाच्या वेळी अत्यंत भावूक झालेले श्रीनिवास औंधकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अभ्यासाचे फळ मिळाल्याचा अनुभव या दिवशी आला. या किरणोत्सवाच्या अनुभवासाठी आमचा अखंड अभ्यास सुरु होता. पण ऐन वेळी आठवडाभर आकाशात सूर्यदर्शनच झाले नव्हते. किरणोत्सवाचा डेमो घेण्याची संधीदेखील आम्हाला मिळाली नव्हती. समाधी दिवसाच्या आधीचे 2-3 दिवस तर पाऊसच होता. पण आमच्या खगोलीय तपस्येचे फळ मिळावे आणि काही क्षण तरी सूर्य दिसावा अशी इच्छा होती, ती खरी ठरली, असे ते म्हणाले.
“भाविकांना समाधी क्षणांची अनुभूती येण्यासाठी विज्ञानाच्या, खगोलशास्त्राच्या माध्यमातून केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ओघळलेले ते अश्रू होते”
– श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्रज्ञ
Very clean website , thanks for this post.
Hey this is a good post. I’m going to mail this to my friends. I stumbled on this while exploring on yahoo I’ll be sure to come back. thanks for sharing.
When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and already every time a comment is added I buy four emails with the exact same comment. Will there be in any manner it is possible to remove me from that service? Thanks!
After study a number of the blog articles on your web site now, we truly as if your way of blogging. I bookmarked it to my bookmark web site list and you will be checking back soon. Pls take a look at my web site also and tell me how you feel.
A lot of thanks for all your valuable hard work on this blog. My aunt take interest in setting aside time for internet research and it’s really easy to understand why. I hear all regarding the compelling means you convey helpful tips and hints on your web site and as well as attract contribution from people on this area of interest while our princess is now becoming educated a lot of things. Enjoy the rest of the new year. Your conducting a fabulous job.
125274 99467All you need to know about News information to you. 839158
Thanks again for the blog.Much thanks again. Keep writing.
Fantastic blog article.Thanks Again. Great.