बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात बार्शीहून पुण्याला पहिली बस रवाना करण्यात आली.
कर्मचार्यांचा संप अद्याप कायम असला तरी आणि कर्मचारी कामावर परतायला तयार नसले तरी संपामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल पाहून एसटीच्या स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत बससेवा सुरु केली आहे. अखेर बससेवा सुरु झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
याबाबत आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगारातील एकूण सहाशे कर्मचार्यांपैकी 32 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळी बार्शी ते पुणे शिवशाही बस क्र. एमएच 14 जीव्ही 3106 ही चालक राजेंद्र अपदार व वाहक प्रसन्न देवकर यांच्या सारथ्याखाली पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्थानिक पातळीवर बस सेवा सुरु करण्यास काही विरोध झाला नाही परंतू खबरदारी म्हणून पुण्यापर्यंतच्या प्रवासात मार्गातील पोलिस ठाण्याच्या हद्दीनुसार पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
दीर्घकाळ चिघळलेल्या संपामुळे खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. जीप, रिक्षा आदी वाहने दुप्पट, तिप्पट भाडे आकारुन लूट करत आहेत. विशेषत: महिला व वृध्दांची मोठी अडचण होत आहे. बससेवा सुरु करण्याची सर्व स्तरातून मागणी होत आहे.
बार्शी हे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारे मोठे वाहतूक केंद्र आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड आदी जिल्ह्यात जाणार्या बहुतांश गाड्या बार्शी मार्गेच जातात. संपामुळे या प्रवाशांची कोंडी झाल्याने प्रवाशांची सतत मोठी वर्दळ असणारे व दिवस-रात्र गजबजलेले बार्शी बसस्थानक गेले काही दिवस स्मशानशांतता अनुभवत आहे. रविवारी सुरु झालेली बस सेवा विस्तारत गेल्यास बार्शी बस स्थानकाला पुन्हा प्रवाशांचे दिन येणार आहेत.
Beobachten Tipps oben, entdecken Grund Taktik, Wege entdecken bis beschäftigen Ihre Bankroll und gewinnen if Sie spielen Blackjack.
I think you will find a issue with your web sites utilizing Opera browser.
Thanks to my father who told me about this webpage, this blog is genuinely remarkable.|
Right on my man!
Whoah this weblog is wonderful i love studying your articles. Stay up the great work! You realize, a lot of individuals are hunting round for this info, you could help them greatly.
I like this blog its a master peace ! Glad I observed this on google .