मुंबई : कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 5 गडी गमावत 140 धावा केल्या. न्यूझीलंड संघाला विजयासाठी अजून 400 धावांची गरज आहे. तर भारताला 5 विकेट्सची गरज आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 276 धावांवर घोषित केला. भारताने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात आपला एक गडी गमावला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यातच टीम इंडियाला दोन धक्के बसले. भारताचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल व मयांक अग्रवाल हे क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरले नाहीत. फलंदाजी करताना मयांकच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर शुबमनच्या हाताला चेंडू लागला आहे.
दिवसाअखेर किवींना 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे. पहिल्या डावात भारताने 325 धावांपर्यत मजल मारली होती.
त्याच्या प्रत्युत्तरात खेळणारा न्यूझीलंडचा संघ 62 धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताने 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर आता 540 धावांचं लक्ष्य आहे. हे आव्हान पुरे करताना भारताच्या गोलंदाजांनी किवींची चांगलीच दमछाक केली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली.
भारताचा फिरकीपटू रवीचंद्नन अश्विनने किवींना पहिला धक्का देत टॉम लॅथमला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर सलामीवीर विल यंगला 20 धावांवर असताना झेलबाद केलं. आर अश्विननं ही विकेट घेतली आणि त्यानंतर लगेचंच टी ब्रेक घ्यावा लागला. स्पायडर कॅमेरा मैदानावर अडकल्यानं 15 मिनिटे आधीच ब्रेक घ्यावा लागला.
टी ब्रेकनंतर आर अश्विननं किवींना आणखी दोन धक्के दिले. डॅरेल मिचेलने 76 चेंडू 51 धावा फटकावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 30 व्या षटकात उमेश यादवला सलग दोन चौकार लगावत त्याने हाफ सेंच्युरी साजरी केली. रवीचंद्नन अश्विनने रॉस टेलरला 6 धावांवर असताना चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केल.
त्यावेळी किवींना तिसरा धक्का बसला होता. अक्षर पटेलने भारताला चौथी आणि महत्त्वाची विकेट मिळून दिली आहे. त्याने डॅरेल मिचेलला 60 धावांवर असताना जयंत यादव करवी झेलबाद केलं. हेन्री निकोल्स 36 आणि रचिन रवींद्र 2 धावा करून खेळत होते. न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 140 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी दोन दिवसांत 400 धावा बनवायच्या आहेत. भारताला मालिका खिशात घालण्यासाठी 5 विकेट्स हव्या आहेत.
* सिंधूला पराभवाचा धक्का
सिंधूला ‘बीडब्लूएफ’ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाच्या ॲन सियोंगचे हिने 21-16 21-12 असे सरळ सेटमध्ये सिंधूला पराभूत केले. डेन्मार्क ओपन स्पर्धेतही सिंधूला तिनेच पराभूत केले होते.