चेन्नई/ नवी दिल्ली : जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. बिपिन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर ते तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. यात एकूण 14 जण प्रवास करत होते. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
तामिळनाडूमध्ये आज झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे, अशा भावना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या आहेत.
देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. त्यांच्या निधनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केलं. ‘देशासाठी हा अतिशय दु:खद दिवस आहे. कारण आम्ही आमचे CDS बिपिन रावत यांना दुःखद अपघातात गमावले. ते शूर सैनिकांपैकी एक होते, त्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा बजावली. त्यांच्या निधनाने मला खूप वेदना होत आहेत, असं शाह यांनी ट्विट केलं.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळले आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. बिपीन रावत गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
बिपिन रावत हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर , हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत. रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. सैन्यात असताना बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत.
तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 14 पैकी 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लीडर, लेफ्टनंट हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र सिंग, एल / एनके विवेक कुमार, एल / एनके बी. साई तेजा, HAV सतपाल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये होते.
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर (Mi-17V5) आज तामिळनाडूच्या कुन्नूर येथे कोसळले आहे. त्यानंतर तातडीने या प्रकरणी भारतीय वायुसेनेने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. यात बिपीन रावत, त्यांची पत्नी, डिफेन्स असिस्टंट, सेक्युरिटी कमांडर्स आणि आयएएफ पायलटचा समावेश होता, असे वृत्त समोर येत आहे.
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर आज तामिळनाडूमध्ये कोसळले आहे. यात जखमी झालेल्या बिपीन रावत यांना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती होती. पण सायंकाळी त्यांच्यावर उपचार चालू असताना निधन झाले.
जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले. रावत यांच्यासह एकूण 14 जण यात प्रवास करत होते. बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लें. क. हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक. जितेंद्र कुमार, ले. नायक विवेक कुमार, ले. नायक बी. साई तेजा, हवलदार सतपाल अशी प्रवास करणा-याची नावे आहेत.
वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्थ झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला.
रशियन शस्त्रास्त्र पुरवठादार Rosoboronexport च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये कॉकपिट आणि स्वरक्षणार्थ यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे रॉकेट, तोफ आणि शस्त्र देखील वाहून नेऊ शकते. Mi-17V-5 हे लष्करामधील सर्वात मोठं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले हेलिकॉप्टर आहे. तसेच हे हेलिकॉप्टर कुठल्याही भौगोलिक स्थिती आणि दिवसा किंवा रात्री अतिशय प्रतिकूल हवामानात चालवता येतं.