Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मतदानासाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या नेत्याला पकडले

Surajya Digital by Surajya Digital
December 21, 2021
in Hot News, महाराष्ट्र
3
मतदानासाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या नेत्याला पकडले
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परभणी : परभणीच्या पालम नगरपंचायतीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना पैसे देऊन मतदान खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला पैसे वाटप करताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी नगदी रक्कम आणि मतदारांच्या याद्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून 25 हजार रोख आणि मतदार याद्या ही जप्त करण्यात आल्या आहेत. लाल खान पठाण असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव आहे.

परभणी जिल्ह्यातील एकमेव नगर पंचायत असलेल्या पालम नगर पंचायतची निवडणूक सुरू असून उद्या मतदान होणार आहे. 17 जागांपैकी ओबीसी आरक्षित 4 जागा सोडून 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठीच पैसे वाटप करताना या खान याला पकडण्यात आले होते.

काल रात्री म्हणजे 19 डिरेंबर रोजी पालम शहरातील वॉर्ड क्रमांक 14 मध्ये हाके गल्लीत राष्ट्रवादीचे उमेदवार लाल खान पठाण हे आपल्या साथीदारांना घेऊन पैसे वाटप करत असल्याची माहिती निवडणूक विभाग फिरते गस्त प्रमुख आकाश पोळ यांना मिळाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोळ यांनी पथकासह या ठिकाणी धाड टाकली. यावेळी एका रजिस्टरमध्ये मतदार यादी घेऊन 500 रुपये प्रमाणे वाटप सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथक प्रमुखांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता लाल खान पठाण आणि एक जण धक्काबुक्की करून पळून गेले. मात्र पथकाने इतर 5 जणांना पकडले. त्यांच्याकडून 25 हजार रुपये जप्त करण्यात आले असून मतदार यादी ही जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आज पालम पोलिसांत लाल खान पठाण, रमेश वाघमारे, अलीम खान पठाण, ज्ञानोबा घोरपडे, भागवत हाके, मधुकर हाके, बापूराव कवडे या 7 जणांवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 186,188, 353, 171 e, 171 b, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक नगर अधिनियम 1965 कलम 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* राज्यात आज 106 नगरपंचायतींसाठी मतदान

– राज्यात आज 106 नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचार जोरात सुरु होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

Tags: #Caught #NCP #leader #distributing #money #voting#मतदान #पैसे #वाटप #राष्ट्रवादीच्या #नेत्याला #पकडले
Previous Post

सोलापुरात आता पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त; पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण

Next Post

सिद्धेश्वर कारखान्याजवळ सत्तुरने मारहाण; टँकर चालक जखमी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शेळगीत नवजात अर्भक आढळल्याने खळबळ

सिद्धेश्वर कारखान्याजवळ सत्तुरने मारहाण; टँकर चालक जखमी

Comments 3

  1. best pull up bar says:
    4 months ago

    Hey, what kind of anti-spam plugin do you use for your blog.”,,”.

  2. Margaret Cainne says:
    3 months ago

    Merci beaucoup pour cet article. C’est vraiment nécessaire de connaitre ce genre d’avis.

  3. เว็บตรงสล็อต says:
    2 months ago

    20551 446335I do not have a bank account how can I place the order? 562695

वार्ता संग्रह

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697