सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ब्रम्हपुर या गावाजवळ घडली. ही घटना आज शनिवारी सकाळी साडेपाच वाजता दामाजी कारखान्याच्या रोडच्याजवळ घडली. यात दोन जण जागीच ठार झाले तर चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले.
यात जैनुद्दिन काशीम यादगिरे (वय ३८ रा. उमदी ता. जत) व मौलाना साजिद खान ( वय – ३५ मुंबई, भिवंडी सध्या उमदी) हे दोघे जण जाग्यावरच मयत झाले आहेत. आणखी चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींमध्ये काँग्रेस नेते वहाब मुल्ला यांचाही समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.
माहिती मिळताच उमदी येथील प्रमुख नेते व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेमुळे उमदी गावावर शोककळा पसरली आहे. जत तालुक्यातील उमदी गावातील सहा जण धार्मिक कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे गेले होते. हा कार्यक्रम संपवून ते उमदी गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. कार सोलापूरहून येत होती. तर टेम्पो मंगळवेढ्याकडून येत होता. अपघात भिषण होता. यात कारचा समोरुन चक्काचूर झाला आहे.
उमदी तालुका जत येथील अनेक जण हैदराबाद या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर जवळील ब्रम्हपुर या गावाजवळ शनिवारी पहाटे आयशर टेम्पो व कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता तिघेजण जागीच ठार झाले.
सोलापूरहुन येणारी कार आणि सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोचा समोरासमोर जोराची धडक होऊन कार गाडी मधील दोन जण जागीच ठार झाले आहेत तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व उमदी तालुका जत येथील असून उमदी गावातील सहा जण इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते. हे हा कार्यक्रम संपवून रात्री उमदी गावाकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. चारजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये कार गाडीचा चक्काचूर झाला आहे.
* चपळगाव येथे महिलेस मारहाण
सोलापूर : चपळगाव (ता. अक्कलकोट) येथे शेतीच्या वादातून डोळ्यात तिखट टाकून कु-हाडीचा दांडा आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत अन्नपूर्णा श्रीशैल अचकीरे (वय ४५) ही महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी (ता. २२) रात्रीच्या सुमारास घडली. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जगदेवी गुंडप्पा माळी आणि अन्य तिघांनी मारहाण केली, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* ओझेवाडी येथे तलवारीने मारहाण
ओझेवाडी तालुका पंढरपूर येथे शेतातील वहिवाटीच्या वादातून तलवार आणि काठीने केलेल्या मारहाणीत दिलीप गोविंद शिरसागर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळच्या सुमारास घडली त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* देवघरातील दिव्याने मुलगी भाजली
सोलापूर – घरात खेळत असताना देवघरातील दिव्याने कपडे पेटून भाजल्याने ६ वर्षाची मुलगी भाजून जखमी झाली. ही घटना येवती (ता.तुळजापूर) येथे गुरुवारी (ता.२३) सकाळच्या सुमारास घडली.
लक्ष्मी राम हाघुले उर्फ कोळी (वय ६ वर्षे रा. येवती) असे भाजलेल्या मुलीचे नाव आहे. तिला उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी ती घरामध्ये खेळत होती. त्यावेळी देवघरातील दिव्याने त्याचे कपडे पेटवून हा प्रकार घडला. अशी नोंद सिव्हिल पोलिसात झाली आहे.
* बऱ्हाणपूर येथे आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : बऱ्हाणपूर (ता.अक्कलकोट) येथे राहणाऱ्या अक्रम हारुन फुलारी (वय २०) या तरूणाने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून बेशुद्धावस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात वडिलांनी दाखल केले. घरगुती वादातून त्याने हा प्रकार केल्याची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली.
* नरखेड येथे विष प्राशन
नरखेड (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या हणमंत नागनाथ राऊत (वय ४५) याने दारूच्या नशेत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता.२३) दुपारच्या सुमारास घडली. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
* पालिकेत तक्रार केली म्हणून महिलेस मारहाण
सोलापूर : विजापूर नाका झोपडपट्टी येथे महापालिकेत पत्राशेड संदर्भात तक्रारी अर्ज का दिला या कारणावरून लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत चांदणी रजाक नदाफ (वय ६०) ही महिला जखमी झाली. ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळच्या सुमारास घडली. त्यांना कासिम शेख त्याचा मुलगा ईलाही, काजल शेख आणि कमरून शेख या चौघांनी मारहाण केली. जखमीस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
* बाळे येथे हॉटेल चालकाकडून मारहाण
सोलापूर : बाळे येथील डेक्कन वाडा हॉटेलमध्ये जेवण करण्याच्या किरकोळ वादातून काठी आणि तीक्ष्ण शस्त्राने केलेल्या मारहाणीत मल्लिकार्जुन देवेंद्र येऊरे (वय ३६ रा. भवानीपेठ, मड्डीवस्ती) हा जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉटेलमधील मालक आणि कामगार यांनी मारहाण केली अशी प्राथमिक नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे.