मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचे कामकाज अत्यंत चांगले झाले. विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावे आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावे अशी सूचना सुधीर मुनगंटीवारांनी मंत्री आदित्य ठाकरेंना केली. आता ही सूचना म्हणजे अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका होती अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सूचनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
राज्याच्या अधिवेशनाचा काळ हा अत्यंत महत्वाचा असून या काळात महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा केली जाते, अनेक विषय मार्गी लावले जातात. नेमक्या अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांची तब्येत व्यवस्थित नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. या काळात मुख्यमंत्रीपदाचा पदभार दुसऱ्या कोणाकडे द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. पण तसंही घडलं नाही. पण विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेमकी उत्तरं दिली आणि आपल्या कार्यशैलीची, नेतृत्वाची चुणूक दाखवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच विषयावरून भाजप नेत्यांनी एकीकडे राष्ट्रवादीला चुचकारलं आहे तर दुसरीकडे नेतृत्वावरून शिवसेना आणि काँग्रेसला टोमणा मारला आहे. त्यामुळे आधीच आघाडीत असलेली बिघाडी येत्या काळात आणखी वाढतेय का हे पाहावे लागणार आहे .
संपूर्ण अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृत्ती अस्वास्थामुळे विधीमंडळामध्ये येऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज अत्यंत चांगलं झालं, या काळात अनेक विषयांना न्याय मिळाला. म्हणून अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावं आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी सूचना मुनगंटीवारांनी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना केली. आता ही सूचना म्हणजे अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका होती अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, “या वेळचं अधिवेशन पाचच दिवस झालं. पण या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झालं. मी आदित्य ठाकरेंना सूचना करतो की अधिवेशन काळात सरकारचं नेतृत्व अजितदादांकडे द्या, इतर वेळी नेतृत्व बाबांकडे (उद्धव ठाकरे) द्या. कारण हे कामकाज तरी होऊ शकलं. अनेक विषय मार्गी लागले. अनेक विषयांना न्याय मिळाला.”
आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातंय. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली.
I am often to blogging and i also genuinely appreciate your website content continuously. The content has really peaks my interest. My goal is to bookmark your web site and keep checking for brand new info.
Aw, i thought this was an extremely good post. In idea I would like to invest writing in this way moreover – taking time and actual effort to manufacture a very good article… but exactly what do I say… I procrastinate alot and no means apparently go completed.
I surely did not realize that. Learnt some thing new these days! Thanks for that.
ceramic floor tiles are the best, i used to have linoleum tiles but they do not last very long-