अक्कलकोट : कोरोनाचे कडक निर्बधांमुळे पालखी परिक्रमा व वारकर्यांची उपस्थिती टाळून यंदा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने प्रासादिक पादुका परिक्रमा गेल्या 30 दिवसात महाराष्ट्र, कर्नाकटक, गोवा या तीन राज्यातील 120 गावे पूर्ण करून तळ कोकणात दाखल झालेली आहे.
दरम्यान प्रासादिक पादुका परिक्रमेचे संयोजक संतोष भोसले यांची टीम 84 दिवसांत ही पादुका परिक्रमा पूर्ण करणार आहेत. कोरोनामुळे कडक निर्बंध पाळून या परिक्रमेसोबत केवळ चार-पाच सेवेकरी आहेत. या दरम्यान कोवीड-19 चे सर्व नियमांचे पालन करीत परिक्रमा सुरु आहे. दर्शनासाठी येणार्या स्वामीभक्तांना लसीकरण, मास्कचा वापर, हातात सॅनिटायझर, दर्शन घेताना सामाजिक अंतर यांची पालन केले जात आहे.
ही प्रासादिक पादुका परिक्रमा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, गोवा, यानंतर तळ कोकणात दाखल झाली आहे. येथील सावंतवाडी, वेंगुर्ले, तरळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर सातार, पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. आजवर 3 राज्यातील 7 जिल्ह्यात सदरची परिक्रमा पोहचली आहे. 16 फेब्रुवारी रोजी अक्कलकोटला सदरची प्रासादिक पादुका परिक्रमेचे आगमन होणार आहे. कोवीडच्या संभाव्य तिसर्या लाटेमुळे यंदा मोजकीच गावे परिक्रमेत घेण्यात आलेली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
□ समर्थ महाप्रसाद सेवेचे अभिनेता भरत जाधवकडून कौतुक
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पूत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांसाठी सुरू असलेली महाप्रसाद सेवाकार्याबरोबरच शहरातील वृध्द, दिव्यांग, निराधार यांना सुरू करण्यात आलेली ’ समर्थ महाप्रसाद सेवा’ समृध्द धार्मिक, अध्यात्मिकतेचे प्रतिक असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी अभिनेते भरत जाधव यांनी केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भरत जाधव हे बोलत होते. त्यांचे समवेत घनशाम घोरपडे, सुधीर टाके आदीजण उपस्थित होते.
यावेळी राज्य गुप्तचर विभाग मंत्रालय मुंबई गृह विभागातील कक्ष अधिकारी संतोष साळुंके, जालनाचे प्रांतधिकारी गणेश निधळे यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, समिर लोंढे, मनोज निकम, प्रविण देशमुख, प्रा. प्रकाश सुरवसे, सौरभ मोरे, प्रथमेश पवार, वैभव मोरे, विशाल कलकुर्गी, प्रविण घाडगे, निखिल पाटील, गोविंदराव शिंदे, सत्तारभाई शेख, दत्ता माने, एस.के.स्वामी, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाटगे, प्रसाद हुल्ले, राजाभाऊ पवार यांच्यासह भक्त, सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.