कोल्हापूर : भरत जाधव मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या भरत भरतने आई वडिलांच्या आठवणीत एक कौतुकास्पद काम केले आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाण राखत भरतने चक्क आई वडिलांचं स्मारक उभारलं आहे. दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात भरतने त्याच्या कोल्हापूरच्या शेतात आई-वडिलांचे स्मारक उभारल्याचे दिसत आहे.
मराठी कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख असलेला भरत जाधव हा त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच गुणी व चांगला आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत त्याने आई-वडिलांचे स्मारक उभारले आहे. हे स्मारक त्याने कोल्हापूर येथील त्याच्या शेतामध्ये उभारला आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भरत जाधव याने केलेल्या कौतुकास्पद कामाबद्दल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांच्या ‘तारका’ या फेसबुक पेजवर एक पोस्ट केले आहे.
यामध्ये त्यांनी ‘पुत्र असावा तर असा’ असे म्हटले आहे. त्याचसोबत त्यांनी भरत जाधवच्या आई- वडिलांचा फोटो पोस्ट केला आहे. भरत जाधवने आई-वडिलांच्या सर्व इच्छा प्रामाणिकपणे पूर्ण केल्या आहेत.
टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या वडीलांसाठी त्याने स्वतंत्र गाडी खरेदी केली होती. तसेच आई-वडिलांना विमानातून नव्या घरी घेऊन गेला होता. भरतने आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते.
चित्रपट, नाटक, मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. भरतचे पछाडलेला, खबरदार, जत्रा असे चित्रपट अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. त्याने जत्रा, वन रूम किचन, पछाडलेला, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे, हसा चकट फु, सही रे सरी अशा किती नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऑल द बेस्ट या नाटकाच्या भरघोस यशानंतर भरत खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.