मुंबई : भाजपचे विधानपरिषद सदस्य आणि उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. एन. सिंह (74) यांचे गोरखपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे मुले-मुली, नातवंडे असा परिवार आहे.
40 ते 50 वर्षापूर्वी मुंबईत आलेल्या सिंह यांनी येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, सभागृह उभारून वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे भाजपने त्यांना सन 2016 मध्ये विधान परिषदेवर नियुक्त केले होते.
विशेष म्हणजे सिंह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कालच त्यांनी उत्तर प्रदेशात आपल्या मूळ गावी गरजूंना मोठ्याप्रमाणात सहाय्य केले होते. तेथून ते आज मुंबईला येण्यासाठी निघाले होते. मात्र गोरखपुर विमानतळावर येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 40 ते 50 वर्षापूर्वी मुंबईत आलेल्या सिंह यांनी येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, सभागृह उभारून वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली.
उत्तर भारतीयांमधील त्यांच्या लोकप्रियतेत यामुळेच भाजपने त्यांना सन 2016 मध्ये विधान परिषदेवर नियुक्त केले होते. उत्तर प्रदेशातील त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे वृत्त आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सिंह यांनी बॉम्बे सिक्युरिटीच्या संचालक पदाचा कारभारदेखील काही काळ सांभाळला आहे. तसेच या माध्यमातून अनेकांना रोजगार दिला होता. आरएन सिंह यांच्या निधनाने भाजपचेच नव्हे तर उत्तर भारतीय समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आमचे आमदार आर. एन. सिंह यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. उत्तर भारतीय समाजाला एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा. त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. हिंदी पत्रकारितेतही त्यांनी मोठे योगदान दिले. या दुःखाच्या काळात आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
हमारे विधायक श्री आर. एन. सिंग जी के अकस्मात निधन के समाचार से बेहद दुखी हूँ ।
उत्तर भारतीय समाज को एकजुट कर, उनकी समस्याओं को सुलझाने का सदा उनका प्रयास रहा।
कई लोगों को उन्होंने रोजगार के अवसर प्रदान किए।
हिन्दी पत्रकारिता में भी उनका बड़ा योगदान रहा।
(1/2) pic.twitter.com/8nN4LbeOD1— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 2, 2022
भाजपचे आमदार प्रसार लाड यांनीही शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, विधान परिषदेचे आमदार आर. एन. सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुखः झाले. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो! त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची देव शक्ती देवो.