Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट, भाजप नेत्याला अटक

Surajya Digital by Surajya Digital
January 6, 2022
in Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र, राजकारण
2
रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट, भाजप नेत्याला अटक
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : उद्धव ठाकरे (udhav thacare) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thacare) या मुख्यमंत्री (cm) होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका भाजप (bjp)  नेत्याने ‘रश्मी ठाकरे या मराठी राबडी देवी (rabadi devi) आहेत’, असे ट्विट (tweet) केले आहे. यामुळे पोलिसांनी भाजप नेत्याला अटक (arrested) केली आहे. दरम्यान, राबडी देवी या लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी (wife) आहेत. लालू यांच्यानंतर त्या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.

जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून ( From health)  चंद्रकांत पाटील यांनी कोपरखळ्या मारल्या होत्या. महाराष्ट्राची राबडीदेवी, अशा शब्दात जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने त्यास अटक केली आहे.

सामनाच्या (samana) संपादक (editor) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत समाज माध्यमावरून आक्षेपार्ह ट्विट ( Offensive tweet) करणाऱ्या जितेन गजारियाला सायबर पोलिसांनी (cyber police) अटक केली आहे. असे आक्षेपार्ह ट्वीट त्यांनी का केले आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता, याबाबत पोलीस त्यांची चौकशी (inquire) करत आहेत.

शिवसेना (shivsena) नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “भाजपनं एक युनिव्हर्सिटी चालू केली पाहिजे. ट्रोलिंग कसं करावं, अपमानित कसं करावं हे शिकवण्यासाठी त्यांचा एक कारखाना आहे. लोकांना अपमानित करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. विकृत मनमोवृत्तीची माणसं 25 हजार रुपये पगारावर (salary) ठेवलीय. रश्मी ठाकरे यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांच्यावर का बोललं जातंय? याप्रकरणी कडक कारवाई व्हायला पाहिजे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दुसरीकडे, जितेन गजारिया यांचे वकील (advocate) विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “जितेन यांचे ट्वीट आक्षेपार्ह नाही आहेत. ते सभ्य भाषेत आहेत. मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून ट्वीट करायला नको असं लोकांना वाटतो. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत राहून ते ट्वीट करण्यात आलं आहे. पोलिसांवर सरकार (government)  दबाव आणत आहे.

‘जितेन गजरिया यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता योग्य ती कारवाई होईल. पण मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कोणाच्याही भावना दुखावतील अशी कृत्य करू नयेत,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी (media) बोलताना प्रतिक्रिया ( Feedback) दिली.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं, “वारंवार मुद्दामहून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या, महिलांचा अपमान (Insult) करणाऱ्या या व्यक्तीला जामीन मिळता कामा नये. दुही आणि तेढ वाढवायचं या लोकांचं काम आहे. स्त्री (lady) आहे म्हणून तिच्याबद्दल अपमानजनक ट्विट केलेले दिसतात.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp leader) नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलंय, “दुसऱ्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोविषयी तक्रार करताना तुमच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीनं काय काय गुण उधळले, त्याच्याविषयी ट्वीट केलं तर बरं होईल. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला यात ओढणं बरोबर नाहीये. ज्याप्रकारे रश्मी ठाकरेंचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते दुर्देवी (Unlucky) आहे.”

Tags: #Offensive #tweet #RashmiThackeray #BJP #leader #arrested#रश्मीठाकरे #आक्षेपार्ह #ट्विट #भाजप #नेत्याला #अटक
Previous Post

एसटी संप – 55 हजार संपकऱ्यांना नोटीस, तर कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय

Next Post

बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक, आता टेलिग्राम चॅनल ब्लॉक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक, आता टेलिग्राम चॅनल ब्लॉक

बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक, आता टेलिग्राम चॅनल ब्लॉक

Comments 2

  1. best rc cars 2021 says:
    4 months ago

    After study a number of the content on your own web site now, and i truly much like your means of blogging. I bookmarked it to my bookmark site list and are checking back soon. Pls consider my internet site at the same time and let me know what you consider.

  2. slot999 says:
    2 months ago

    154178 896255Good read, I just passed this onto a colleague who was doing just a little research on that. And he just bought me lunch since I discovered it for him smile So let me rephrase that: Thank you for lunch! 186902

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697