Wednesday, May 18, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सुभाष देशमुख पोहचले शिवदारेंच्या बांबू बनात; राजकारणात कोण कोणाला कधी बांबू लावेल !

Surajya Digital by Surajya Digital
January 12, 2022
in Hot News, राजकारण, सोलापूर
2
सुभाष देशमुख पोहचले शिवदारेंच्या बांबू बनात; राजकारणात कोण कोणाला कधी बांबू लावेल !
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकारण (political) वेगानं बदलतयं. माजी आमदार दिलीप माने (ex mla dilip mane) आणि दक्षिणचे तथा काँग्रेस नेते सुरेश हसापुरे (congress leder  suresh hasapure ) यांची जवळकी वाढतेय आहे. अलिकडेच मानेंच्या फॉर्महाऊसवर हसापुरे आणि अन्य नेते मंडळी पोहचली. तर आता दुसऱ्या बाजूला राजशेखर शिवदारे यांच्या शेतावर आ. सुभाष देशमुखांचा ( mla subhash deshmukh) दौरा नुकताच पार पडला.

राजकारणात आपल्याला कोण कधी बांबू लावेल ! अशा विचारात आणि सावध भूमिकेत राजकारणी पावलं टाकत असतात. नव्हे दौरेही करत असतात असंच म्हणावे लागेल. दिलीप मानेंचा दक्षिण तालुक्यातील वाढता बाबर, त्यांना हसापूरे आणि अन्य मंडळींचा मिळणारा पाठिंबा हा राजकीय धोका लक्षात घेवून तर सुभाष देशमुख, राजशेखर शिवदारे ( rajshekhar shivdare) यांच्या बांबू शेती (Bamboo Agriculture ) पाहण्याच्या निमित्त इंगळगीच्या शेतावर पोहचले नाहीत ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे भाजपाचे जेष्ठ नेते पाशा पटेल (bjp leader pasha patel) हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. आगामी काळात इथेनॉल, बायोगॅस वरील वाहनांची निर्मिती वाढणार आहे. इथेनॉलसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे हे जाणून शिवदारेंनी बांबूची लागवड आधीच केली आहे. आता तो त्यांच्या व्यवसायाला आणि सुभाष देशमुखांच्या राजकीय करियरलाही आधार ठरणार का? हे आगामी काळात पहावे लागेल.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ दिलीप मानेंच्या फार्महाऊसवर महाविकास आघाडी नेत्यांची रंगली हुरडापार्टी

सोलापूर : माजी आमदार  ( ex mla) तथा बाजार समितीचे संचालक दिलीप माने (dilip mane) यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील फार्महाऊसवर (farmhouse) सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक (meeting) पार पडली. जिल्ह्याचं नेतृत्व बबनदादा व सोपल साहेबांनी करावं, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती (information) आहे.

या बैठकीला ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (DCC bank) संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची उपस्थिती (attended) होती. यावेळी महाविकासआघाडी (mahavikas aghadi)  मधील राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress) , शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.

जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (ganpatrao deshmukh) व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक (sudhakarpant paricharak) हे दोन्ही नेते एकत्रित बसून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा दूध संघाची (milk) मोट व्यवस्थित बांधत होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी ( Large cavity) निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघावी हा या बैठकी मागचा उद्देश (Purpose)  होता, हे काय लपून राहिले नाही.

आगामी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघाची निवडणूक (election) ही एकत्रितपणे येऊन लढवायची तसेच जिल्हा परिषद (zp) आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करून या माध्यमातून सर्व निवडणुका लढवायच्या असे या बैठकीत निश्चित झाल्याचे वृत्त (news) आहे.
मात्र या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणे आणि समन्वय ठेवण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री (ex minister) दिलीप सोपल या दोन नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्याचे ठरले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती (spekar) आमदार विजयकुमार देशमुख हे सध्या राजीनामा (resigned  ) देण्यास तयार नाहीत, त्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर झालेली ही बैठक निश्चितच अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणारी आहे. या बैठकी आडून आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दबावतंत्र (Pressure system)  वापरले जाणार का, अशीही चर्चा होत आहे.

Tags: #SubhashDeshmukh #arrives #rajshekharShivdare #Bamboo #Banat #plant #politics!#सुभाषदेशमुख #शिवदारे #बांबू #बनात #राजकारण #दिलीपमाने
Previous Post

सिद्धेश्वर यात्रा : तैलाभिषेक सिध्दरामेश्वर यात्रेला सुरूवात, आमदार देशमुखांनी व्यक्त केली नाराजी

Next Post

मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; करमाळ्यात निवृत्त पोलीस अधिका-याला भावानेच फसवले

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; करमाळ्यात निवृत्त पोलीस अधिका-याला भावानेच फसवले

मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; करमाळ्यात निवृत्त पोलीस अधिका-याला भावानेच फसवले

Comments 2

  1. Dating app 2022 says:
    4 months ago

    Teen want to meet you! Click Here: http://inx.lv/jutg

  2. headphones best sellers says:
    4 months ago

    We retain listening towards information converse with regards to getting cost-free on the internet give capabilities so I are actually looking for close to for that absolute best how does someone obtain one.

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697