Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सिद्धेश्वर यात्रा : तैलाभिषेक सिध्दरामेश्वर यात्रेला सुरूवात, आमदार देशमुखांनी व्यक्त केली नाराजी

Surajya Digital by Surajya Digital
January 12, 2022
in Hot News, सोलापूर
1
सिद्धेश्वर यात्रा : तैलाभिषेक सिध्दरामेश्वर यात्रेला सुरूवात, आमदार देशमुखांनी व्यक्त केली नाराजी
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना पार्श्वभूमीवर सोलापूरच्या सिध्दरामेश्वर महायात्रेत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे नियम पाळत 68 लिंगांना तैलाभिषेक करीत आज सिध्देश्वर यात्रा सुरु झाली आहे.

आज सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठात पुजाविधी पार पडला. यावेळी पुजारी मानकरी आणि नंदीध्वज धारक अशा 50 जणांनाच प्रवेश पास देण्यात आले होते. यंदा नंदीध्वजाची मिरवणूक नाही. केवळ वाहनातून पालखी निघाली आहे, तर वाहनांमधूनच यात्रेचे मानकरी मंदिर आणि नंतर तैलाभिषेकासाठी रवाना झाले. आज 68 लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहन आहे. सिध्देश्वर मंदिरातही दर तासाला 500 जणांना पास दिले जात आहे.

यात्रेनिमित्तानं सिध्दरामेश्वर मंदिर तसेच 68 लिंगांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाराबंदी घातलेले युवक एकदा भक्तलिंग हर्रऽ बोला हर्रऽ सिध्देश्वर महाराज की जय असा जयघोष करीत पालखीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. “Once the bhaktalinga harra bola harra siddheshwar maharaj ki jai ”

उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या  वाड्यात काल मंगळवारी रात्री बारा वाजता मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास सांज चढवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू व राजशेखर देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांचा  पूजा करण्यात आली. आज बुधवारी सकाळी आठ वाजता सात नंदीध्वज सिद्धेश्वर (Siddheshwar) मंदिरात नेऊन ठेवण्यात आला.

□ सिद्धेश्वर महायात्रेस प्रारंभ; मंदिर परिसरात संचारबंदी

नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. नंदी ध्वज (मानाच्या काठ्या घेऊन) 68 लिंगांना तैला अभिषेक करण्यात आले आहे. सिद्धेश्वर महायात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू (rajshekhar Hirehabbu) यांच्या वाड्यापासून सिद्धेश्वर महायात्रा सुरू झाली. परंतु कोरोना महामारी किंवा ओमीक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी फक्त पन्नास जणांना परवानगी देण्यात आली आहे. मंदिर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

एकदा भक्त लिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या नंदीध्वजांची आणि पालखीची पूजा करण्यात येऊन तैलाभिषेकासाठी पालखीसह मानकरी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात (In a devotional atmosphere) मार्गस्थ झाले.

ग्रामदैवत श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची सुरुवात 68 लिंगाच्या तैलाभिषेका या धार्मिक विधीने झाली. सर्वप्रथम उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यामध्ये अमृतलिंग पूजासह मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाच्या पूजनाने पालखी मार्गस्थ झाली. गेल्या वर्षीपासून कोरोना सावटाखाली सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा संपन्न होत आहे. यावर्षी तरी यात्रा मोठ्या स्वरूपात साजरी करता येईल, अशी आशा भक्तांच्या मनात होती. परंतु कोरोनाच्या नवा व्हेरीयंट ओमायक्रोन संसर्गामुळे प्रशासनाने मोठ्या स्वरूपात यात्रा करण्यास बंदी घातली.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

केवळ 50 जणांच्या उपस्थितीमध्ये आणि साध्या पद्धतीने यात्रा संपन्न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देवस्थान समिती आणि यात्रा प्रमुखांनी साध्या पद्धतीने यात्रा पार पाडण्यासाठी नियोजन केले त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यामध्ये काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी (Kashipeetha’s successor Dr. Mallikarjun Shivacharya Mahaswami) यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत लिंगासह मानाच्या नंदीध्वजांची आणि पालखीची पूजा करण्यात आली. त्यानंतर तैलाभिषेकासाठी पालखीसह यात्रेचे मानकरी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात 68 लिंगाकडे मार्गस्थ झाले.

यावेळी दुसऱ्या नंदीध्वजाचे मानकरी आमदार विजयकुमार देशमुख (mla vijaykumar deshmukh) किरण देशमुख मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण आदींसह मानकरी उपस्थित होते. आरती आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर यात्रा प्रमुख हिरेहब्बू बंधूंना बग्गीमध्ये विराजमान करण्यात आले. त्यानंतर विविध फुलांनी सजवण्यात आलेल्या रथांमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी प्रतिमा ठेवण्यात आली. तद्नंतर मंगल वाद्याच्या गजरामध्ये तसेच सिद्धेश्वर महाराजांच्या जयघोषामध्ये विधिवत पद्धतीने पालखी मार्गस्थ झाली.

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा सिद्धेश्वर भक्तांनी लांबूनच श्रींचे दर्शन घेतल्याचे पहावयास मिळाले. यावेळी हिरेहब्बू यांच्या वाड्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वत्र बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना अमृत लिंगाचे तसेच पालखीचे दर्शन घेता आले नाही. या पार्श्वभूमीवर यात्रेचे मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील आमदार विद्या चव्हाण यांनी देखील वाड्यामध्ये जाऊन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. तदनंतर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना श्रींचे दर्शन घेऊन आनंद झाल्याचे सांगितले कोरोनाच्या ओमीक्रोन (Omicron) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने यात्रा संपूर्ण होत असताना सिद्धेश्वर भक्तांच्या मनामध्ये मात्र यात्रा मोठ्या प्रमाणात होत नसल्याने हुरहूर दिसून आली. यावेळी हिरेहब्बू वाडा परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती.

– महायात्रेबाबत आमदार विजय देशमुख यांनी नाराज व्यक्त केली. दरवर्षी सोलापुरातील सिद्धेश्वर महायात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून काही मोजक्या भाविकांना आणि मानकऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर महायात्रा संपन्न होत आहे. दरवर्षी महायात्रेवर अनेक निर्बंध लागू होत असल्याने भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगा जवळ विडा  देण्याचा कार्यक्रम होईल मंदिरातील गाभाऱ्यात महापूजा झाल्यानंतर ६८ लिंगांना योग दंडाच्या साक्षीने तैला अभिषेक करण्यात येणार आहे 13 जानेवारी रोजी संमती कट्ट्याजवळ सात नंदीध्वज याच्या साक्षीने अक्षता सोहळा होईल. 14 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हळद काढण्याचा कार्यक्रम होईल संध्याकाळी होम मैदानावर होम विधीचा कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर फडकुले सभागृह जवळ भाकणूकीचा कार्यक्रम होईल. 16 जानेवारी रोजी दक्षिण कसब्यातील देशमुख यांच्या वाड्यात योग दंडाच्या पूजनाने धार्मिक विधीची सांगता होईल. रात्री दहा वाजता नंदीध्वजांचा वस्त्र विसर्जन कार्यक्रम होईल. त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.

• हा रस्ता सर्वांसाठीच बंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr. Babasheb anbedkar) पार्क चौक (Park chouk), मंगळवेढेकर इस्टिट्यूट कॉर्नर, ह. दे. प्रशाला समोरील रस्ता, स्ट्रिट रोड, सिध्देश्वर कन्या प्रशालासमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचारबंदी (carfu)आदेश लागू आहे. यामुळे हा मार्ग नागरिकांना रहदारीसाठी वापरता आला नाही.

यात्रेसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

□ गड्डा यात्रा नसल्याने भाविकांत नाराजी

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर यात्रेला आजपासून (बुधवारी) तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. त्याच्या पूर्वसंध्येला मंदिरात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा कालावधीत मंदिरात ऑनलाइन पासधारकांनाच प्रवेश मिळणार असल्याने शेकडो भाविकांनी श्री सिध्दरामेश्वरांचे दर्शन घेतले.

कोरोना महामारीमुळे यंदाही तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमविधी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नसल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. शिवाय गड्डा यात्रेतील मनोरंजनाच्या आनंदापासून बच्चे कंपनी दुरावणार आहे.

मात्र, मंदिर परिसरात पार पडणाऱ्या धार्मिक विधींच्या थेट प्रक्षेपणाद्वारे भक्तांना या सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे. गड्डा यात्रा म्हटले की, आबालवृध्दांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. मात्र, गड्डा मैदान परिसर यंदा कोणत्याही मनोरंजनाच्या दालनाविना सुनासुना वाटत आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून या परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Tags: #Siddheshwar #Yatra #Tilabhishek #Siddharmeshwar #Deshmukh #expresses #displeasure#सिद्धेश्वरयात्रा #तैलाभिषेक #सिध्दरामेश्वर #देशमुख #व्यक्त #नाराजी
Previous Post

सिद्धेश्वर यात्रा : आज 68 लिंगांना तैलाभिषेक, सिध्देश्वर मंदिर परिसरात संचारबंदी

Next Post

सुभाष देशमुख पोहचले शिवदारेंच्या बांबू बनात; राजकारणात कोण कोणाला कधी बांबू लावेल !

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सुभाष देशमुख पोहचले शिवदारेंच्या बांबू बनात; राजकारणात कोण कोणाला कधी बांबू लावेल !

सुभाष देशमुख पोहचले शिवदारेंच्या बांबू बनात; राजकारणात कोण कोणाला कधी बांबू लावेल !

Comments 1

  1. best athletes foot treatment says:
    4 months ago

    Music started playing any time I opened this web page, so frustrating!

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697