सोलापूर – शिर्डी (shridi) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग (Musical chair skating) स्पर्धेत सोलापूरच्या व्हिल्स रोलर स्केटिंग क्लबमधील अबोली सुरवसे व आर्यराज सुरवसे या बंधू भगिनींनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांची गोवा (Goa) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दोघांना व्हिल्स रोलर स्केटिंग क्लबचे (Wheels roller skating club) संस्थापक व प्रशिक्षक (coach) दीपक घंटे (deepak ghante) तसेच सायकलिंग असोसिएशनचे (Cycling Association) अध्यक्ष प्रतापसिंह कांचन-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Two Wheels from Solapur selected for National Skating Championship
□ व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय विजेत्या संघात बार्शीच्या दोन विद्यार्थिनींचा समावेश
बार्शी : राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या 18 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुणे (pune) विभागाने (division) अजिंक्यपद पटकावले. विजयी संघामध्ये बार्शीतील (barshi) महाराष्ट्र (maharashtra) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वैष्णवी दादासाहेब शिराळकर व भगवंत प्रसाद सुलाखे वाणिज्य महाविद्यालयातील मृणाल प्रदीप माने यांचा समावेश होता.
उस्मानाबाद (osmanabaad) येथे दिनांक 3 ते 5 जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विजयी खेळाडूंचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सह सचिव अरूण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य गणपत चव्हाण व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संघ व्यवस्थापक (Admin)) म्हणून रूपाली शिंदे यांनी काम केले. विजयी खेळाडूंना डॉ. सुरेश लांडगे यांचे मार्गदर्शन (Guidance) लाभले.
● राष्ट्रीय सिनियर सेपक टकरा स्पर्धेत सोलापूरच्या दोन खेळाडूंचे उत्कृष्ट कामगिरी
सोलापूर :– सोलापूर शहर व जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या (District Sepak Takraw Association) कल्याणी बिले व संचीता पवार यांची यांनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कास्यपदक मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवाडा पंजाब येथे झालेल्या एकतिसाव्या सीनियर नॅशनल सेपक टकरा स्पर्धेत कु कल्याणी बिले व कु संचीता पवार यांनी डबल मध्ये हिमाचल प्रदेशचा 21-14, 21- 16 गोवा संघाचा यांचा 21 -18, 21 -17 असा पराभव करून सेमीफायनलमध्ये राजस्थान (Rajasthan) संघाकडून 24- 22, 20 -22 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.
राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला या यशाबद्दल असोसिएशनचे सल्लागार व जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक येताळा भगत यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी असो. अध्यक्ष संजय सावंत, सचिव रामचंद्र दत्तू क्रीडा शिक्षक प्राध्यापक विजय दत्तू, विठ्ठल बिले, वाघमारे सर यांची प्रमुख उपास्थिती होती. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी दीड हजार याप्रमाणे तीन हजार रुपयाचे व रोख पारितोषिक समृद्धी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संचालक चंद्रकांत होळकर यांनी दिले.
वरील दोन्ही खेळाडूंचे असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश बसाटे, अंबादास पांढरे, सहसचिव शहानवाज मुल्ला, पंचप्रमुख श्रीकृष्ण कोळी, प्रसिद्धीप्रमुख गणेश कुडले, रवी चव्हाण यांनी अभिनंदन केले.