Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

वीस हजाराची लाच घेताना तलाठी समाधान काळेला ठोकल्या बेड्या

Surajya Digital by Surajya Digital
January 12, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
1
वीस हजाराची लाच घेताना तलाठी समाधान काळेला ठोकल्या बेड्या
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : शेतातील रस्ता वहिवाटीसाठी खुला (open) करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी (Hearing on application) होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच (bribe) मागितली. त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी अटक केले.

समाधान बाळासाहेब काळे (वय- ३३ वर्ष, व्यवसाय- नोकरी, पद- तलाठी, सज्जा- खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या अक्कलकोट तालुक्यातील मौजे अंकलगे येथील शेतजमिनीमधून जाणे – येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट, अक्कलकोट येथे अर्ज सादर केला होता.

दाखल अर्जावर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्याबाजूने निकाल लावून सदर निकालाची प्रत देण्याकरीता यातील आरोपी समाधान काळे, तलाठी सज्जा खानापूर, तहसील अक्कलकोट यांनी आपले लोक सेवक पदाचा दुरुपयोग केला. त्यांना कायद्याने मिळवायचे त्याखेरीज आणि अन्य पारीतोशन म्हणून तक्रारदार त्यांच्या अंकलगे येथील शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल त्यांच्या बाजूने लावून देतो म्हणून २५,००० रुपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, हे सिद्ध झाले.

While taking a bribe of Rs 20,000, Talathi Samadhan was handcuffed

यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने तलाठी काळे आज बुधवारी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस (Akkalkot North Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो पुणे,व गुरव अप्पर पोलीस अधीक्षक , ब्युरो पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव पाटील, पोलीस उप अधिक्षक ॲन्टीकरप्शन ब्युरो सोलापुर, उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक, पोहवा/सोनवणे, पोना/ श्रीराम घुगे, पोकों/उमेश पवार व पोकों/ स्वप्नील सणके सर्व नेम ॲन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी पार पाडली.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● ४ घरफोड्या करणाऱ्या आरोपीला विशेष पथकाने केली अटक; २ लाखाचे दागिने जप्त

सोलापूर – विजापूर नाका पोलीस (vijapur naka police) ठाण्याच्या हद्दीत ४ ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या आकाश महादेव उडानशिवे (वय २३ रा. देवनगर,सोरेगाव) या सराईत गुन्हेगाराला पोलिस आयुक्तालयातील विशेष पथकाने नुकतीच अटक ( arrested) केली.

त्याच्या ताब्यातून रोख १३ हजार रुपये, सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ३ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आकाश उडानशिवे हा सराईत गुन्हेगार जुना विजापूर नाका परिसरातून पिशवीतून काहीतरी नेत असल्याची माहिती विशेष शाखेच्या पथकाला मिळाली.

त्याप्रमाणे सहाय्यक निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार दिलीप  भालशंकर, योगेश बर्डे, वाजिद पटेल, संजय साळुंखे आणि नरेंद्र नक्का यांनी त्याला पकडून चौकशी केली. असता त्याच्या पिशवीमध्ये एटीएम मशीन  फोडण्यासाठी लागणारे गॅसकटर, घरफोडीचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी अधिक तपास (investigating) केले असता त्याने विजापूर नाका हद्दीतील रोहिणी नगर, सहारा रोड, ब्रह्मदेव नगर, आशिर्वाद नगर तसेच जुळे सोलापूर (jule solapur) या ठिकाणी चोरी केल्याचे  उघडकीस आले.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ४ ठिकाणच्या चोरीतील दागिने jewelry, मोबाईल mobile, गॅस कटर gas cutter, तसेच घरफोडीचे साहित्य जप्त केले. अटकेतील आरोपीला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: #taking #bribe #Talathi #Samadhan #handcuffed#वीसहजार #लाच #तलाठी #समाधानकाळे #ठोकल्या #बेड्या
Previous Post

सोलापूरच्या ‘व्हिल्स’च्या दोघांची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Next Post

महाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
महाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी  ७ कोटींचा निधी मंजूर

महाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर

Comments 1

  1. grapeseed oil all your questions answered says:
    4 months ago

    never saw a website like this, relaly impressed. compared to other blogs with this article this was definatly the best site. will save.

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697