बार्शी : बिगबुल bigbull विशाल अंबादास फटे याने नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आज सोमवारी दुपारी सोशल मीडियावर on social media येवून आपल्यावरील आरोपांबाबत परस्पर-विसंगतीने भरलेले स्पष्टीकरण देवून मखलाशी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळी त्याने पोलिस अधीक्षकांच्या sp office कार्यालयात शरणागती पत्करली.
शरणागती पत्करल्याने विशाल फटे स्कॅमचा Vishal Fate scam पहिला अध्याय आज समाप्त end झाला. वडिल, भावाच्या अटकेनंतर आईला अटक होण्याची शक्यता दिसू लागताच मातृभक्त Mother devotee विशाल याने शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबियांना यापासून बाजूला ठेवा, असे आवाहन तो त्यासाठी वारंवार करत होता. तत्पूर्वी रेल्वे स्थानकाजवळ relway stiton असलेल्या एका इमारतीतून त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग video recording केले. आणि ते आपल्या नावाने उघडलेल्या अकाऊंटवर पोस्ट account post केले.
यू ट्युबवर YouTube सुमारे साडे सत्तावीस मिनिटाच्या आपल्या व्हिडीओत बोलताना विशाल याने आपण देशाबाहेर पळून गेलेलो नाही. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यामुळेच आपण बार्शी barshi सोडल्याचे सांगितले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पहिल्यांदा पत्नी, लहान मुलीसह आत्महत्या करण्याचा विचार केला होता. घोटाळ्याबाबत चर्चेतले आकडे अवास्तव आहेत. माझ्याकडे झालेली गुंतवणूक investment खूप कमी आहे. ती फेडण्याचा माझा प्रयत्न आहे. फिर्याद देणार्या दिपक अंबारेने माझ्याकडून खूप नफा कमविलेला आहे. इतर अनेकांचाही मी खूप फायदा करुन दिलेला आहे. 10 लाखाचे 6 कोटी परत देण्याचा माझा प्रयत्नच होता. मी एका दिवसात 4 लाखाचे 54 लाख केले आहेत. त्यामुळे मला ते अवघड नव्हते.
माझ्याकडे अनेक डॉक्टरांनी doctor, प्रशासकीय अधिकार्यांनी गुंतवणूक केली. ती विचारपूर्वकच केली. मला काहीजणांकडून पैसे येणार होते, मात्र ते न आल्याने मला बार्शी सोडावी लागली. जाण्यापूर्वीही मी काहीजणांना लाखो रुपये दिले गेल्यानंतर माझ्या बँक खात्यात सुमारे दोन कोटी रुपये होते. त्यापैकी काहीजणांनी पैसे काढून घेतले आहेत.
मी खरोखरच शेअर बाजारात ट्रेडिंग share bazar treding करत होतो. नफा मिळविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होतो. कोविड काळात सुमारे दीड वर्षे माझ्याकडे असणार्या गुंतवणूकदारांना मी दरमहा रिटर्न दिले आहे. माझ्याकडून चुका झाल्या. त्यामुळे लोकांचे माझ्याकडे पैसे money अडकले. त्याबद्दल होणारी शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. सर्व घोटाळ्याची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेत आहे. माझ्या कुटुंबियांचा यात संबंध relationships नाही. मी अनेक लोकांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली. ते लोक सुध्दा आज माझ्याविरोधात उभे राहिले आहेत, असे म्हणत त्याने आपले वडिल कंपनीत भागीदार असल्याचे कबूल केले.
माझ्यापेक्षा मोठमोठे घोटाळे Big scams करणारे बाहेर आहेत. त्यांना कोणीही हात लावू शकले नाही. त्यांच्याविरुध्द केसेस झाल्या नाहीत. माझ्याविरोधात मात्र अनेकांनी तक्रारी दिल्या. ज्यांच्याकडे सायकल ciycl नव्हती, ते माझ्यामुळे चारचाकीमध्ये four whiller फिरू लागलेत. माझ्याविरोधात जी कायदेशीर कारवाई legally action सुरु आहे. त्याला मी सामोरे जाणार आहे. माझी खूप बदनामी झाली. त्यामुळे कुटुंबांसह स्वत:ला संपविण्याचा विचार होता. मात्र मी आता शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तो त्या व्हिडीओत म्हणाला आहे.