विरवडे बु (प्रकाश गव्हाणे) : राज्यात अनेक दिवसांपासून एसटी st कर्मचाऱ्यांचा संप strike सुरूच असून अद्याप बहुसंख्य कर्मचारी सेवेत परतले नाहीत. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अशा आर्थिक विवंचनेतून मार्ग The way out of financial difficulties काढताना सोलापुरात solapur एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क म्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
सोमनाथ बाळासाहेब अवताडे (वय ३३ रा विरवडे बु ता. मोहोळ) हे एसटी महामंडळाच्या सोलापूर आगारात गेल्या सहा वर्षांपासून एसटी चालक म्हणून नोकरी करत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बहुसंख्य कर्मचारी संपावर ठाम आहेत. सोमनाथ यांच्या घरात वृध्द आई-वडील, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह चालविण्याची जबाबदारी सोमनाथवर आहे.
या संपात सोमनाथ अवताडे यांचाही सहभाग आहे. पण संप लांबल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मिळणे बंद झाले आहे. त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यातून काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्यांसारखा टोकाचा मार्ग पत्करला आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मुलांनीही आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ST driver took up ‘Vastra’ for subsistence; The end of ST opens the world
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या पार्श्वभूमीवर सोमनाथ अवताडे Somnath Avtade यांनी संपात सक्रिय सहभागी होताना स्वतःची आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणून कमीपणा न बाळगता चक्क म्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. इतर वेळी ते खासगी वाहनांवर private vehicle बदली चालक म्हणून काम करत आहेत. आठवड्यात साधारणतः चार दिवस सोमनाथ यांच्याकडे मोकळा वेळ असतो. या फावल्या वेळेत ते म्हशी Buffalo भादरण्याचे काम करतात. एका म्हशीमागे दीडशे रुपयांचा मोबदला मिळतो. आठवड्यात हजार रूपयांची कमाई होते, असे सोमनाथ यांनी सांगितले.
करोना आणि टाळेबंदीच्या corona & lockdown काळात अनेक दिवस एसटी बसेस बंद होत्या. त्याकाळात गावातील वारिक समाजाच्या एका मित्राबरोबर म्हैस भादरण्याचे काम आवडीने शिकले. सोमनाथ यांनी हे काम न लाजता आणि संकोच न बाळगता शिकून घेतले. आजही हे काम work पोटासाठी करतो, असे सोमनाथ यांनी नम्रपणे नमूद केले.
संपकरी एसटी कर्मचारी म्हशी भादरण्याचे काम करतो म्हणून लोक सहानुभूती Empathy दाखवितात. गोपालक मंडळीही त्यांच्या म्हशी भादरण्याच्या कामासाठी जास्त मोबदला देत आहेत. पण आपण ठरलेलाच मोबदला घेतो. आपणांस कोणाची सहानुभूती नको. स्वाभिमानाने जीवन जगायचे आहे. त्यासाठी रोजगाराचे साधन निवडताना लाज बाळगण्याचे कारण नाही, असेही सोमनाथ यांनी सांगितले.