मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील फोटो व्हायरल झाला आहे. सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये आज गेले होते. तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. त्यामुळे सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशा प्रकारे फाईल्स बघितल्या आहेत? असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या विरोधकांची प्रकरणे बाहेर काढण्याबाबत प्रसिद्ध आहेत. विरोधकांवर टीका करुन त्यांची घोटाळ्याची कुंडली बाहेर काढत असल्याचा ते नेहमीच दावा करत असतात. आज ते पुन्हा चर्चेत आले आहेत. किरीट सोमय्या यांनी आज मंत्रालयात जाऊन फाईल बघितल्याने खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. bjp leader kirit somaiya in the ministry sitting on an employee chair and looking at files
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
किरीट सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशाप्रकारे फाईल्स बघितल्या आहेत? असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे. तसेच अधिकार्यांनीही कोणत्या अधिकारात या फाईल दाखवल्या याबाबत चर्चा सुरू आहे. मंत्रालयात तर यावरून विचारणा होत आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे हसन मुश्रिफ, अजित पवार, मिलिंद नार्वेकर Shiv Sena leader Anil Parab, NCP’s Hasan Mushrif, Ajit Pawar, Milind Narvekar यांच्यावर पत्रकार परिषद घेवून गंभीर आरोप केले होते. जरंडेश्वर साखर कारखाना, तसेच हसन मुश्रिफांचा कारखाना यात घोटाळा झाल्याचे गंभीर आरोप सोमय्यांनी या अगोदर केले होते.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा ३ कोटी रुपयांचा दंड माफ केल्यावरुन राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा आता सोमय्यांनी दिला आहे. राज्य सरकारने प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा २०१३ पासूनचा ३ कोटी ३३ लाख ९६ हजारांचा दंड माफ केला आहे. यावर १८ टक्के व्याज देखील लागू आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने आमदार प्रताप सरनाईक यांचा १८ कोटी रुपयांचा दंड आणि कर माफ केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.