Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील

Surajya Digital by Surajya Digital
January 24, 2022
in Hot News, महाराष्ट्र
1
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड झाली आहे. समितीची राज्य कार्यकारी समिती, सल्लागार समिती, सर्व राज्य विभागाचे सदस्य या सर्वांच्या सोमवारी Monday झालेल्या ऑनलाईन राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये एकमताने सरोजताईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या नावास महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळाने Board of Trustees of Maharashtra ANNIS ही मान्यता दिली आहे.

समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील The founding president of the committee is Pvt. N. D. Patil यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोजताईंचे यांचे नाव सुचविण्यात आले. सरोजताईंनी ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. सत्यशोधक चळवळीचा विचार मानणाऱ्या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला.

सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार Rationalist thinking उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पति म्हणून लाभले. समिती सोबत त्या संघटनेच्या स्थापनेपासून कृतिशील पणे जोडल्या गेलेल्या आहेत. अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचे वैचारिक नाते आहे. सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळच्याही सदस्य आहेत. Saroj Patil as the Chairman of Maharashtra Superstition Eradication Committee

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सरोजताई sarojtai यांनी बी. ए. बी. एड. केल्यानंतरची दहा वर्षे शिक्षक आणि 25 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पटसंख्या व गुणवत्ता अशा सर्व आघाड्यांवर मागे पाडलेल्या, वंचित वर्गातील मुलांच्या शाळा गजबजलेल्या व गुणवत्तापूर्ण करण्याचे त्यांनी या शाळेपासून सुरू केलेले काम आजही अखंड चालू आहे. मुलांचा कल ध्यानात घेऊन त्यांना रोजगाराभिमुख करणारे प्रशिक्षण सुरू केले. आजूबाजूच्या समाजातील प्रतिष्ठित लोकांना शाळेशी जोडून घेतले व त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी 250 मुलामुलींना दत्तक पालक योजनेचा लाभ दिला.

□ दोन आमदार, दहा नगरसेवक विद्यार्थी

सत्यशोधक चळवळीचा विचार The idea of ​​a truth-seeking movement मानणाऱ्या कुटुंबात सरोज पाटील यांचा जन्म झाला. सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पती म्हणून लाभले. सरोज पाटील या शाळेतील त्यांचे दोन विद्यार्थी आमदार तर दहा विद्यार्थी नगरसेवक झाले आहेत. या कामाची दाखल घेऊन शासनाने त्यांना राज्य पुरस्काराने व मुंबई महापालिकेने महापौर पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

□ राज्यपालांच्या हस्ते सात वर्षे गौरव

परिसरात झाडे लावणे, जोपासणे यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या कामासाठी त्यांच्या शाळेला सलग सात वर्षे राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणारा वृक्ष सन्मित्र पुरस्काराने सन्मानित Awarded the Tree Sanmitra Award करण्यात आले. निवृत्तीनंतर सरोजताईंनी त्यांचे गाव ढवळी येथील शाळेकडे लक्ष दिले. आज एक हजार लोकसंख्येच्या गावातील या शाळेत आजूबाजूच्या 12 गावांतून मुले येतात. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या  Karmaveer Bhaurao Patil College at Islampur त्या सचिवा आहेत.

Tags: #SarojPatil #Chairman #Maharashtra #Superstition #Eradication #Committee#महाराष्ट्र #अंधश्रद्धा #निर्मूलन #समिती #अध्यक्षपदी #सरोजपाटील
Previous Post

शरद पवार यांना कोरोनाची लागण, पीएम मोदींसह अनेक नेत्यांचे फोन

Next Post

किरीट सोमय्या मंत्रालयात : फाईल्स केल्या चेक, कोणत्या अधिकाराने फाईल्स बघितल्या ?

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
किरीट सोमय्या मंत्रालयात : फाईल्स केल्या चेक, कोणत्या अधिकाराने फाईल्स बघितल्या ?

किरीट सोमय्या मंत्रालयात : फाईल्स केल्या चेक, कोणत्या अधिकाराने फाईल्स बघितल्या ?

Comments 1

  1. high end wigs says:
    3 months ago

    553782 480891Spot lets start function on this write-up, I truly think this fabulous site needs a great deal much more consideration. Ill apt to be once again to learn far a lot more, appreciate your that information. 158125

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697