मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी कोविड पॉझिटिव्ह kovid positive चाचणी केली आहे परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार treatment घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती request करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ट्विट पवारांनी केले आहे.
शरद पवार यांना करोनाची लागण (Sharad Pawar Tested Corona Positive) झाली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.
८१ वर्षीय शरद पवार यांनी करोनाची पहिली लस १ मार्च २०२१ रोजी घेतली होती त्यानंतर ७ मार्च २०२१ रोजी त्यांनी कोरोना प्रातिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला होता.
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं पवार यांनी आज सोमवारी (२४ जानेवारी) दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आजोबा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच आमदार रोहित पवार mla rohit pawar यांनी ट्वीट केलं आहे. आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’
अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार parth pawar यांनीही ट्वीट केलं आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘आजोबा काळजी घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल.’
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
आजोबा
काळजी घ्या
तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल https://t.co/2sEEiLlYBm— Parth Pawar (@parthajitpawar) January 24, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या,’
सर्व पक्षातील नेत्यांनी फोन, मेसेज करून लवकर बरे होण्यासाठी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. पवारांनी केलेल्या ट्विटनंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांना कोरोनावर मात करुन लवकर बरं होण्यासाठी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींबरोबरच काँग्रेसचे महाराष्ट्रामधील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात balasheb thorat यांच्याबरोबरच इतरही नेत्यांचा समावेश आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी pm narendra modi यांनीदेखील फोन करुन शरद पवारांची चौकशी केली आहे. शरद पवारांनी ट्वीट tweets करत ही माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे,” असं शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.