मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आदित्य ठाकरेजींनी म्हटलंय की राज्यपालांना थेट भेटणे हे घटनेत बसत नाही. अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला लागतंय. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे एकदा फोनवरुन उपलब्ध झाले. उद्धव ठाकरे फोनवरही उपलब्ध होत नाहीत.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावरून ही पाटील यांनी आक्षेप घेतला. काल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं, त्यावरही टीका केलीय.
कालचे भाषण साधारणत: दसऱ्याला तेच भाषण होतं आणि आधीच्या दसऱ्यालाही तेच भाषण होतं. एखादा माणूस चुकला किंवा निराश झाला की त्यामुळे तो थयथयाट करतो. तसेच थयथयाटच्या माध्यमातून आपली भूमिका कशी बरोबर आहे आणि दुसऱ्यांची कशी चुकीची आहे, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. तसंच थयथयाट सर्वच भाषणामध्ये एकसारखं आहे.
मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोकेन, तोडेन अशी भाषा वापरणं योग्य नाही, असा आक्षेप भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, मानसिक तणाव व्यक्त करण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री या पदावर बसल्यानंतर ही भाषा बरोबर नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा विसरून सर्वांना समान न्याय दिला पाहीजे. त्यांची भाषा ठोकेन, तोडेने अशीच असते. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणं योग्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनी यावर विचार करण्याची गरज आहे. ‘Your father doesn’t visit us, that’s why we have to meet the governor’
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणाबाबत आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे. त्यावर आदित्य ठाकरे aditya thacare म्हणाले होते की, राज्यपाल हा विरोधकांचा अड्डा झालेला आहे. परंतु मुख्यमंत्री cm जर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास उपलब्ध नसतील तर मग महाराष्ट्राचं सर्वोच्च घटनात्मक स्थान The highest event location राज्यपाल असतं. लोकायुक्त हे अद्यापही ज्यॉईन झालेलं नाहीयेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट करणार की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाहीये. शिवसेना ही वारंवार हिंदुत्वाची भाषा करत आहे. हिंदुत्व हे तुम्ही सोडलंय की नाही हे काँग्रेसला तुम्ही सांगा. आम्हाला काहीही सांगण्याची आवश्यकता नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दोन वर्षांच्या कालवधीत मला एकदाच उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. तसेच कोविडच्या निमित्ताने त्यांनी मला फोन केला होता. तसेच आम्ही त्यांना वाढदिवस आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही ते आम्हाला भेटले नाहीत. आम्ही आजारपणाच्या काळात आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही ते उपलब्ध नव्हते. फक्त कोविडच्या आढाव्यामध्ये त्यांची आणि आमची भेट meet झाली होती. मात्र, मला जर भेटणं इतका दुरचा विषय असेल तर सर्वसामान्यांना आनंदच आहे, असं पाटील म्हणाले.
□ राज्यपालांची घेतली होती भेट
अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शनिवारी मुंबईत केली. राज्यपालांना निवेदन सादर केले.
सरकार स्थापन करताना मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते. तथापि, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, प्रदेश सचिव संदिप लेले, ठाणे शहराध्यक्ष आ. निरंजन डावखरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आ. राहुल नार्वेकर, ॲड. शहाजीराव शिंदे, ॲड. कुलदीप पवार आणि प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.