‘या’ विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही
पाटणा : उत्तर प्रदेश – बिहारमधील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर रेल्वेने (RRB) RRB NTPC CBT 2 आणि Group D CBT 1 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे भरती मंडळाच्या नॉन – टेक्निकल Non-technical पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बिहारच्या आरामध्ये विद्यार्थ्यांनी students एका पॅसेंजर ट्रेनला आग The train caught fire लावली. पोलिसांवर दगडफेक केली. नंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
रेल्वे भर्ती बोर्डाच्या NTPC परीक्षेबाबत अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना यापुढे रेल्वे किंवा सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. भारतीय रेल्वेने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी तपास यंत्रणांची मदत घेतली जाईल असंही रेल्वेने नोटिसीमध्ये म्हटलं आहे.
बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने आंदोलक विद्यार्थ्यांना भविष्यातील रेल्वेतील नोकरीसाठी अपात्र ठरवण्याचा इशारा दिला होता. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या कारवाईच्या धमकीनंतरही आंदोलन सुरू होते.
Stone throwing, arson and firing! Railways cancels exams
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रेल्वे मंत्रालयाने RRB-NTPC आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या श्रेणी-1 ची भरती परीक्षेवर स्थगिती Postponement of examination दिली आहे. भरती परीक्षेच्या निकालानंतर नाराज असलेल्या परीक्षार्थींच्या तक्रारींच्या सुनावणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या निकालावर नाराजी व्यक्त करत आंदोलन केले होते. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला होता.
RRB-NTPC विभागाचा निकाल जाहीर result dealer झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी याविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले होते. बिहारमध्ये दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी रेल रोको real roko आंदोलनही केले होते. त्याशिवाय काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवरही ताबा मिळवला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला. रेल्वेने जाहीर केलेल्या निकालात घोळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
मंगळवारी सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण बिहारमधील इतर भागांमध्येही पसरले. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. RRB-NTPC च्या परीक्षेचा निकाल 14-15 जानेवारी रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. एक कोटी 40 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.