नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ex cm बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. पत्रक काढत भट्टाचार्य यांनी याबाबत माहिती दिली. तर काही वेळात बंगाली गायिका मुखर्जी यांनीही आपणास अपमान वाटत असल्याचे म्हणत पुरस्कार नाकारला.
माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य म्हणाले, मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीही माहिती नाही. मला याबाबत कुणी विचारले नाही. जर कुणी मला हा पुरस्कार दिला असेल तर मी तो पुरस्कार नाकारत आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे २००० ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.
यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर declared झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पण आता या पुरस्कारांवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांनाही केंद्र सरकारने (Central Government) पद्म भूषण पुरस्कार जाहीर केला. पण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन तासात पुरस्कार नाकारला आहे. पुरस्काराबाबत आपल्याला कळवलेच नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. Former Chief Minister Padma Bhushan and Bengali singers denied Padma Shri
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यातच आता ९० वर्षांच्या प्रसिध्द बंगाली गायिकेने पुरस्कार नाकारल्याचे समोर आले आहे. बंगालमधील प्रसिध्द गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता. पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला. पद्म पुरस्कार नाकारणारे दोघेही बंगालमधील आहेत. मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता Soumi Sengupta यांनी याबाबत माध्यमांना माहिती information दिली. आईनेच हा पुरस्कार स्वत:हून नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
‘नव्वदाव्या वर्षी तिच्यासारख्या महान गायिकेला पदश्री पुरस्कार देणं, अपमानजनक आहे. पुरस्कार नाकारण्यामागे कोणतीही राजकीय भूमिका role नाही. राजकारणापासून आई कोसो दूर आहे. त्यामुळे यामागे कोणतेही राजकीय कारण politics reson शोधू नये. तिला अपमानजनक वाटल्याने पुरस्कार नाकारला,’ असेही सेनगुप्ता यांनी स्पष्ट केला. मुखर्जी यांनी हजारो बंगाल गाणी गायली असून इतर डझनभर भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना 2011 मध्ये बंगालमधील सर्वोच्च बंग भूषण पुरस्कार Banga Bhushan Award देण्यात आला आहे. 1970 मध्ये त्यांना सर्वोच्च चित्रपट गायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.
संध्या मुखर्जी यांनी अनिल विश्वास, मदन मोहन, एस़डी़ बर्मन, रोशन आणि सलील अशा अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. त्यांना ‘बंग विभूषण’सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
very nice post, i surely enjoy this internet web page, carry on it
Hey There. I found your blog using msn. This is an extremely well written article. I will be sure to bookmark it and return to read more of your useful information. Thanks for the post. I will certainly return.