अक्कलकोट : सोलापूर – अक्कलकोट solapur – akkalkot महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ tolnaka आज बुधवारी (ता. २६ ) सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात accident झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, बलकर ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले acp Atul bhosale, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे हे घटनास्थळी पोहचले. Two trucks, bizarre accident in car on Solapur-Akkalkot highway; Six seriously injured
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रकमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. अपघातातील मदतीचे कार्य help work दोन तास सुरू होते.
दरम्यान, ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवित हानी टाळणे शक्य झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दैनिक ‘सुराज्य’ daily surajya शी बोलताना दिली.
□ अपघातातील जखमींची नावे
सचिन सुरेंद्र खटके (वय ३५), सपना सचिन खटके (२६) परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय ४०),पल्लवी गिरिष तिवारी (वय २८), तीन लहान मुले (सर्व रा . उस्मानाबाद) व – ट्रक चालक गणेशन या सर्वांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवले.