माढा नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण गटासाठी जाहीर
माढा – माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज मुंबई मध्ये ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाली. यामध्ये माढ्याचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने माजी नगराध्यक्षा ॲड. मिनलताई साठे यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबतची केवळ शासकीय औपचारिकता बाकी राहिली आहे. दरम्यान आरक्षणाची बातमी माढ्यात कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
माढा नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत माढेकरांनी पुन्हा एकदा 17 पैकी 12 जागा काँग्रेस पक्षाला देऊन बहुमताने सत्ता दिली. गेली पाच वर्षात केलेल्या विकासकामांची पोहोचपावतीच माजी नगराध्यक्षा ॲड. मिनलताई साठे याना मतदारांनी दिली. Madha Nagar Panchayat: Minaltai Sathe will be elected as the Mayor for the second time
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
माजी आमदार अॅड. धनाजीराव साठे ad. Dhnajirao sathe यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक नेते youth leader दादासाहेब साठे यांच्या नियोजनाखाली व मिनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत चांगले यश good success मिळाले. यामुळे पुन्हा एकदा मिनलताई साठेच नगराध्यक्षा व्हाव्यात ही तमाम माढेकरांची आणि समस्त महिलांची इच्छा The wishes of Madhekar and all women असून नियतीनेही मान्य केल्याचे आरक्षण reservations सोडतीतून सिद्ध झाले आहे.
येत्या काही दिवसात नगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. येणाऱ्या आठ दिवसात नूतन पदाधिकारी यांच्या निवडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.